महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

गुजरात : ब्रेक फेल झाल्याने जीपचा भीषण अपघात, ६ ठार तर ७ गंभीर जखमी

अपघातात ६ जण जागीच ठार झाले आहेत. तर, ७ जण गंभीर जखमी झाली आहे. जखमींना दांता येथील सिव्हील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे, असे पोलिसांनी सांगितले आहे.

By

Published : Jun 7, 2019, 8:58 PM IST

अपघातग्रस्त

अंबाजी- गुजरातमधील अंबाजी जिल्ह्यात ब्रेक फेल झाल्यामुळे जीप पलटी होवून झालेल्या अपघातात ६ जण जागीच ठार झाले आहेत. तर, ७ जण गंभीर जखमी झाली आहे. जखमींना दांता येथील सिव्हील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

अपघातग्रस्त जीप

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जीपमध्ये जवळपास २६ प्रवासी होते. जीप वेगात असतानाच ब्रेक फेल झाला. यामुळे, रस्तावरील वळणावर जीप पलटी झाली. यामध्ये जीपमधील प्रवासी गंभीर झाले आहेत. सध्या अपघातात ६ जण ठार आणि ७ जण जखमी आहेत. परंतु, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details