महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

कोरोनाबाधित 24 कर्मचारी आढळल्यानंतर कामगार मंत्रालयाला टाळे

देशात 1 लाख 45 हजारांपेक्षा जास्त अॅक्टिव रुग्ण आहेत. तर सुमारे 1 लाख 54 हजार रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. आत्तापर्यंत 8 हजार 884 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

By

Published : Jun 13, 2020, 8:11 PM IST

कामगार मंत्रालय
कामगार मंत्रालय

नवी दिल्ली - कोरोनाचे 24 रुग्ण आढळून आल्यानंतर 'श्रम शक्ती भवन' म्हणजेच कामगार मंत्रालयाच्या कार्यालयाला सील करण्यात आले आहे. कार्यालयात पुढील दोन दिवस निर्जुंतूकीकरणाचे काम चालणार आहे, अशी माहिती अधिकाऱयांनी दिली. सर्व कोरोना पॉझिटिव्ह कर्मचाऱ्यांना विलगीकरणात राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

कोरोना बाधित कर्मचाऱयांच्या संपर्कात आलेल्या 17 कर्मचाऱ्यांना होम क्वारंटाईन होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मागील काही दिवसांत रेल्वे मंत्रालय आणि इतरही मंत्रालयात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढली आहे.

आज भारताने कोरोनाग्रस्तांचा तीन लाखांचा टप्पा पार केला. देशात 1 लाख 45 हजारांपेक्षा जास्त अॅक्टिव रुग्ण आहेत. तर सुमारे 1 लाख 54 हजार रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. आत्तापर्यंत 8 हजार 884 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details