महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

महाराष्ट्राला नैसर्गिक आपत्तीग्रस्त राज्य घोषित करा; शिवसेनेचे संसदेबाहेर आंदोलन

अतीवृष्टी, महापूर आणि चक्रीवादळांच्या तडाख्यामुळे महाराष्ट्रातील लोकांचे, शेतकऱ्यांचे आणि मच्छिमारांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. अजूनही त्यातून लोक सावरले नाहीत. त्यामुळे महाराष्ट्र राज्याला नैसर्गिक आपत्तीग्रस्त राज्य घोषित करावे, अशा आशयाचे फलक हाती घेऊन सेना खासदार आणि कार्यकर्ते संसदेच्या बाहेर आंदोलन करत आहेत.

Sena MP Protest at Parliment

By

Published : Nov 18, 2019, 11:56 AM IST

नवी दिल्ली - महाराष्ट्रात झालेल्या अतीवृष्टीमुळे लोकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. या अतीवृष्टीला नैसर्गिक आपत्ती घोषित करण्याची मागणी करत, शिवसेना खासदार संसदेबाहेर आंदोलन करत आहेत.

अतीवृष्टी, महापूर आणि चक्रीवादळांच्या तडाख्यामुळे महाराष्ट्रातील लोकांचे, शेतकऱ्यांचे आणि मच्छिमारांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. अजूनही त्यातून लोक सावरले नाहीत. त्यामुळे महाराष्ट्र राज्याला नैसर्गिक आपत्तीग्रस्त राज्य घोषित करावे अशा आशयाचे फलक हाती घेऊन सेना खासदार आणि कार्यकर्ते संसदेच्या बाहेर आंदोलन करत आहेत.

दरम्यान, शिवसेनेने एनडीएच्या बैठकीला अनुपस्थिती दर्शवल्यामुळे, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाआधी दोन्ही सभागृहातील शिवसेना सदस्यांना विरोधी पक्षांच्या बाजूला बसण्यास सांगण्यात आले आहे. त्यामुळे सेनेची एनडीएमधून हकालपट्टी केल्याच्या चर्चा सुरु आहेत.

हेही वाचा :७ वर्षात बाळासाहेबांना शोभेल असे एकही स्मारक नाही, निलेश राणेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

ABOUT THE AUTHOR

...view details