नवी दिल्ली - बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसिना ४ दिवसाच्या भारत दौऱ्यावर आहेत. आज शेख हसिना यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. दोन्ही देशादरम्यान ६ ते ७ करारावर सह्या झाल्या आहेत.
पंतप्रधान शेख हसिना भारत दौऱ्यावर; भारत-बांग्लादेशादरम्यान ६ ते ७ करारांवर सह्या
बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसिना ४ दिवसाच्या भारत दौऱ्यावर आहेत. दोन्ही देशादरम्यान ६ ते ७ करारांवर सह्या झाल्या आहेत.
मी शेख हसिना यांच्यासोबत तीन योजनांचे उद्घाटन केले, याचा मला आनंद आहे. या तिन्ही योजना वेगळवेगळ्या विभागांमध्ये आहेत. गेल्या एका वर्षामध्ये व्हिडिओ प्रोजक्टच्या माध्यमातून ९ प्रकल्प लाँच केले आहेत. आजचे तीन मिळून आम्ही तब्बल १२ प्रकल्पाचे उद्घाटन केले आहे, असे मोदींनी सांगितले.
दरम्यान शुक्रवारी पंतप्रधान शेख हसिना यांनी बांग्लादेशला होणारी काद्यांची निर्यात भारताने अचानक थांबवल्याने नाराजी व्यक्त केली होती. भविष्यामध्ये कोणत्याही वस्तूची निर्यात थांबवली तर निदान सूचना द्या, अशी विनंती त्यांनी केली. देशांतर्गत बाजारपेठेत कांद्याचे दर कडाडल्याने केंद्र सरकारने २९ सप्टेंबरपासून कांद्याची निर्यात थांबवली आहे.
TAGGED:
f Bangladesh Sheikh Hasina