रांची - झारखंड विधानसभा निवडणुकीचे बिगूल वाजलं आहे. रविवारी काँग्रेसने आपला जाहिरनामा प्रसिद्ध केला. यामध्ये राज्यातली प्रत्येक कुटुंबातील एका सदस्याला नोकरी देण्याचे आश्वासन दिले आहे. याचबरोबर सरकार आल्यानंतर 6 महिन्यांच्या आत राज्य सरकारच्या विविध विभागांतील आणि क्षेत्रीय कार्यालयांतील रिक्त पदे भरण्यात येतील, असे काँग्रेचे नेते आरपीएन सिंह यांनी सांगितले.
काँग्रेसच्या जाहिरनाम्यातून...
- पोलीस नोकऱ्यांमध्ये महिलांना मोठ्या प्रमाणात संधी देण्यात येईल.
- शेतकर्यांचे 2 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ केले जाईल.
- रांचीमध्ये मेट्रो सेवा सुरु करण्यात येईल.
- ज्या कुटुंबाचे उत्पन्न हे 10 हजारांपेक्षा कमी असेल. त्या कुटुंबातील मुलांना सायकल देण्याता येईल.
- मॉब लिंचिगविरोधात कठोर कायदा करण्यात येईल.
- प्रत्येक ग्रांमपंचायतीमध्ये इंटरनेट सेवा देण्यात येईल.
- प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक ग्रंथालय उभारण्यात येईल. याचबरोबर एक ई-ग्रंथालय सुरु करण्यात येईल, अशा योजनांची काँग्रेसने आपल्या जाहिरनाम्यातून घोषणा केली आहे. या जाहिरनाम्यात शेतकऱ्यांपासून स्त्रियांपर्यंत अशी सर्वांची काळजी घेतली आहे.