महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

राजीव गांधी हत्याकांड : मद्रास उच्च न्यायालयाने दोषी रॉबर्ट पायसला दिली 30 दिवसांची पॅरोल

रॉबर्ट पायस हा राजीव गांधींच्या हत्या प्रकरणातील सात दोषींपैकी एक आहे. तो 1991 पासून तुरुंगात आहे. त्याला त्याच्या मुलाच्या लग्नाच्या तयारीसाठी आणि लग्न समारंभात सहभागी होण्यासाठी पॅरोल हवा होता. न्यायमूर्ती एम. एम. सुंदरेश आणि टेका रहमान यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला.

By

Published : Nov 21, 2019, 5:10 PM IST

राजीव गांधी

चेन्नई - देशाचे माजी पंतप्रधान राजीव गांधी हत्याकांडातील गुन्हेगारांपैकी रॉबर्ट पायस याला मद्रास उच्च न्यायालयाने 30 दिवसांची पॅरोल मंजूर केली आहे. न्यायालयाने रॉबर्टला त्याच्या मुलाच्या लग्नासाठी ही रजा मंजूर केली आहे.

न्यायमूर्ती एम. एम. सुंदरेश आणि टेका रहमान यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. रॉबर्ट पायस हा राजीव गांधींच्या हत्या प्रकरणातील सात दोषींपैकी एक आहे. तो 1991 पासून तुरुंगात आहे. त्याला त्याच्या मुलाच्या लग्नाच्या तयारीसाठी आणि लग्न समारंभात सहभागी होण्यासाठी पॅरोल हवा होता.

न्यायमूर्ती सुंदरेश आणि टेका रहमान यांच्या खंडपीठाने पॅरोलसाठीच्या याचिकेवर सशर्त पॅरोल मंजूर केला. न्यायालयाने रॉबर्टला पॅरोलच्या काळात त्याचे घर असलेल्या चेन्नई येथील कोट्टिवाकम येथेच रहावे लागेल.

ABOUT THE AUTHOR

...view details