महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

'मोदी हे पंतप्रधान पदाला शोभेल असे वागत नाहीत'

'पंतप्रधान पदाला एक विशेष दर्जा असतो. मात्र, मोदी हे पंतप्रधान पदाला शोभेल असे वागत नाहीत', असे राहुल गांधी संसदेबाहेर पत्रकारांशी बोलताना म्हणाले.

राहुल गांधी
राहुल गांधी

By

Published : Feb 7, 2020, 8:31 PM IST

नवी दिल्ली -पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी लोकसभेत भाषण करताना राहुल गांधींना ट्यूबलाइट म्हटले होते. त्यावर काँग्रेस नेता राहुल गांधी यांनी आज पलटवार केला. 'पंतप्रधान पदाला एक विशेष दर्जा असतो. मात्र, मोदी हे पंतप्रधान पदाला शोभेल असे वागत नाहीत', असे राहुल गांधी संसदेबाहेर पत्रकारांशी बोलताना म्हणाले.

'पंतप्रधानांना एक वेगळे महत्त्व असते. सामान्यपणे पंतप्रधान पदाला एक विशेष दर्जा असतो. तसेच त्यांचे वागणे हे एका वेगळ्या दर्जाचे असते. त्यांना विशेष स्थान असते. मात्र, मोदींमध्ये यातील काहीच नाही. ते पंतप्रधान पदाला शोभेल असे वागत नाहीत', असे राहुल गांधी म्हणाले.

संसदेमध्ये आम्हाला बोलण्याची परवानगी दिली जात नसून आमचा आवाज दाबला जात आहे, असेही राहुल गांधी म्हणाले. यापुर्वी राहुल गांधींनी मोदींवर बेरोजगारीवरून टीका केली होती. देशामध्ये सर्वांत मोठी समस्या ही बेरोजगारी आणि नोकऱ्यांची आहे. याबाबत आम्ही पंतप्रधानांना विचारले. मात्र, ते यावर एक शब्द ही बोलले नाहीत. तसेच अर्थमंत्र्यांनी देखील आपल्या लांबलचक भाषणात बेरोजगारीचा उल्लेख केला नाही', असे राहुल गांधी म्हणाले होते.

दरम्यान आज संसदेमध्ये गदारोळ झाला. पंतप्रधान मोदींना देशातील जनता सहा महिन्यात दांडक्याने मारणार आहे, असे वक्तव्य राहुल गांधींनी केले होते. या वक्तव्याचा भाजप नेत्याने निषेध दर्शवला. त्यावर भाजप आणि काँग्रेस सदस्यांमधील वाद एवढा वाढला की प्रकरण धक्काबुक्कीपर्यंत आले. त्यानंतर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सभागृहाचे कामकाज स्थगित केले.

हेही वाचा -श्रीलंकेचे पंतप्रधान महिंदा राजपक्षे ४ दिवसांच्या भारत दौऱ्यावर

ABOUT THE AUTHOR

...view details