नवी दिल्ली -ज्योतिरादित्य सिंधिया काही महिन्यांपासून राहुल गांधी यांना भेटण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, त्यांना भेटण्याची संधीच देण्यात आली नाही, असे प्रद्योत माणिक्य देववर्मा म्हणाले होते. त्यावर राहुल गांधी यांनी प्रद्योत माणिक्य देववर्मा यांचे म्हणणे फेटाळले आहे. ज्योतिरादित्य हे एकटे नेते होते, जे माझ्या घरी कधीही येऊ शकत होते, अशी प्रतिक्रिया राहुल गांधी यांनी दिली आहे.
'ज्योतिरादित्य हे एकटे नेते होते, जे माझ्या घरी कधीही येऊ शकत होते'
ज्योतिरादित्य हे एकटे नेते होते, जे माझ्या घरी कधीही येऊ शकत होते, अशी प्रतिक्रिया राहुल गांधी यांनी दिली आहे.
प्रद्योत माणिक्य देववर्मा यांनी एका फेसबुक पोस्टच्या माध्यमातून ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या राजिनाम्यासंदर्भात खुलासा केला होता. गेल्या अनेक महिन्यापासून ज्योतिरादित्य सिंधिया यांनी राहुल गांधींची भेट घेण्यासाठी वाट बघीतली. मात्र, त्यांना भेटण्याची संधी देण्यात आली नाही, असे प्रद्योत माणिक्य देववर्मा यांनी म्हटले होते.
आज दिल्लीत आयोजित एका कार्यक्रमात ज्योतिरादित्य सिंधिया यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी भाजपचे इतर नेतेही उपस्थित होते. जे. पी नड्डा यांनी सिंधियांचे भाजपमध्ये प्रवेश केल्याबद्दल अभिनंदन केले. केंद्रीय मंत्री धर्मेद्र प्रधान, मध्यप्रदेश भाजप अध्यक्ष बी. डी शर्मा उपस्थित होते.