महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

रेवा सोलार आशियातील सर्वात मोठा प्रकल्प नाही; पंतप्रधान कार्यालयाच्या ट्विटला राहुल गांधींचं उत्तर

मध्यप्रदेशातील रेवा जिल्ह्यातील सोलार प्रकल्प आशिया खंडातील सर्वात मोठा प्रकल्प असल्याचे ट्विट पंतप्रधान कार्यालयाने केले होते. यावर राहुल गांधींनी मोदींवर टीका केली आहे.

By

Published : Jul 11, 2020, 4:18 PM IST

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नवी दिल्ली - मध्यप्रदेशातील रेवा जिल्ह्यात पंतप्रधान मोदींनी काल(शुक्रवार) 750 मेगा वॅटच्या सोलार प्रकल्पाचे व्हिडिओ कॉन्फन्सिंगद्वारे उद्घाटन केले. हा प्रकल्प आशियातील सर्वात मोठा प्रकल्प असल्याचे ट्विट पंतप्रधान कार्यालयाने केले होते. यावरून राहुल गांधी यांनी पंतप्रधानांवर टीका केली आहे.

पंतप्रधान कार्यालयाने काल(शुक्रवार) सोलार प्रकल्पाच्या उद्धाटनानंतर ट्विट केले होते. रेवा जिल्ह्यातील हा प्रदेश नर्मदा नदी आणि पांढऱ्या वाघांसाठी ओळखला जातो. तो आता आशियातील सर्वात मोठ्या सोलार प्रकल्पासाठीही ओळखला जाईल, असे या ट्विटमध्ये म्हटले होते.

राहुल गांधींनी पंतप्रधान कार्यालयाने केलेल्या ट्विटला टॅग करुन 'असत्याग्रही' फक्त एवढेच लिहले. असत्याग्रही म्हणजे ज्या व्यक्तीचा सत्यावर विश्वास नाही अशा अर्थाने राहुल गांधींनी ट्विट करत मोदींना टोला लगावला. आशिया खंडातील सर्वात मोठा सोलार प्रकल्प असल्याचे विधान खरे नसल्याचे राहुल गांधींनी ट्विटवरून सुचित केले.

कर्नाटक राज्यातील काँग्रेस नेते आणि माजी उर्जा मंत्री डी. के. शिवकुमार यांनीही मोदींवर निशाणा साधला. मध्यप्रदेशातील रेवा जिल्ह्यातील सोलार प्रकल्प(750MW) आशिया खंडातील सर्वात मोठा प्रकल्प असल्याचा दावा सरकार कसे काय करू शकते. याचे उत्तर केंद्रीय उर्जा मंत्रालयाने द्यावे. कारण, कर्नाटकातील पावागड येथील सोलार प्रकल्प 2 हजार मेगा वॅटचा आहे, आणि या प्रकल्पाचे 2 वर्षांपूर्वीच उद्घाटन झाले आहे, असे शिवकुमार म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details