महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

'साबरमतीत सत्य जिवंत आहे,' प्रियांका गांधींचे पहिले ट्विट

प्रियांका गांधी यांनी फेब्रुवारी २०१९ मध्येच ट्विटर अकाऊंट सुरु केले आहे. मात्र, मंगळवारी त्यांनी पहिले ट्विट केले. त्यानंतर पाच मिनिटांनी दुसरे ट्वट केले. या ट्विटमध्ये त्यांनी साबरमती आश्रमामधील फोटो टाकला आहे. साबरमतीच्या साधेपणात सत्यता आहे, असे त्यांनी या ट्विटमध्ये लिहिले आहे.

प्रियांका गांधी

By

Published : Mar 13, 2019, 1:45 PM IST

नवी दिल्ली - उत्तर प्रदेश (पूर्व)च्या काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी पद स्वीकारल्यानंतर मंगळवारी प्रथमच गुजरातमधील गांधीनगर येथे जाहीर सभा घेतली. पहिलीच जाहीर सभा तीही मोदींच्या 'गृह राज्यात' असल्याने सर्वांचे लक्ष त्यांच्याकडे होते. अपेक्षेप्रमाणेच यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली. सभेतनंतर प्रियंका गांधींनी ट्विटरवरही आगमन केले आहे. 'साबरमतीत सत्य जिवंत आहे,' असे पहिले ट्विट त्यांनी मंगळवारी केले.

प्रियांका गांधी यांनी फेब्रुवारी २०१९ मध्येच ट्विटर अकाऊंट सुरु केले आहे. मात्र, मंगळवारी त्यांनी पहिले ट्विट केले. त्यानंतर पाच मिनिटांनी दुसरे ट्वट केले.या ट्विटमध्ये त्यांनी साबरमती आश्रमामधील फोटो टाकला आहे. साबरमतीच्या साधेपणात सत्यता आहे, असे त्यांनी या ट्विटमध्ये लिहिले आहे. दुसऱ्या ट्विटमध्ये त्यांनी महात्मा गांधींनी दिलेला अहिंसेचा संदेश दिला आहे.

काँग्रेसने मंगळवारी अहमदाबादमधून लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा बिगुल वाजवला. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, यूपीए अध्यक्ष सोनिया गांधी, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्यासह प्रियांका गांधी उपस्थित होत्या. ‘गेल्या लोकसभा निवडणुकीत काहींनी प्रत्येकाच्या खात्यात पंधरा लाख रुपये जमा करण्यापासून ते महिला सुरक्षेपर्यंत अनेक आश्वासने दिली. त्या आश्वासनांचे काय झाले’, असा सवाल प्रियांका यांनी केला.

‘देशातील घडामोडींमुळे मी दुखी आहे. देशातील संस्था उद्धस्त करण्यात येत आहेत. सर्वत्र द्वेष पसरवला जात आहे. द्वेषाचे रुपांतर प्रेमात करण्याची या देशाची संस्कृती आहे. देश वाचविण्यास आपले प्राधान्य असायला हवे. त्यामुळे अधिक सजग राहून कार्यरत राहणे ही देशभक्तीच ठरेल’, असे प्रियांका यांनी म्हटले.

ABOUT THE AUTHOR

...view details