लखनौ - काँग्रेस सचिव प्रियांका गांधी वाड्रा यांनी उत्तर प्रदेशमधील ६९ हजार शिक्षकांच्या नियुक्तीसंदर्भातील प्रकरणाची तुलना ही मध्य प्रदेशच्या व्यापम घोटाळ्याशी केली आहे. त्यांनी सोमवारी ट्विट करत उत्तर प्रदेशमधील ६९ हजार शिक्षकांची नियुक्ती या राज्यातील व्यापम घोटाळा आहे असे म्हटले आहे.
प्रियांका गांधी यांनी त्यांच्या ट्विटरवरुन ट्विट करत उत्तर प्रदेश सरकारच्या शिक्षण भरती प्रक्रियची निंदा केली आहे. त्यांनी ६९ हजार शिक्षकांची भरती प्रक्रिया ही मध्य प्रदेशच्या व्यापम घोटाळ्यासारखी असल्याचे ट्विट केले आहे. या प्रकरणात झालेल्या गडीबडीतील तथ्य सामान्य नाहीत. डायरीमध्ये असलेले विद्यार्थ्यांचे नाव, पैशांची देवाणघेवाण, परीक्षा केंद्रामध्ये होणारी हेराफेरी या सर्व बाबींचा रॅकेटमध्ये असलेला समावेश यातूनच या प्रकरणातील जाळे किती जागी पसरले आहे ते दर्शवते असे त्या म्हणाल्या. मात्र, याचा परिणाम परिश्रम करणाऱ्या विद्यार्थ्यांवर व्हायला नको. सरकार जर न्याय करु शकली नाही तर, आंदोलन करून या सर्वांना प्रत्युत्तर देण्यात येईल, असे त्या म्हणाल्या.