गंगटोक- सिक्किम क्रांतीकारी मोर्चाचे (एसकेएम) नेते प्रेम सिंह तमंग यांनी आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राजनाथ सिंह यांनी ट्विटरवरुन प्रेम सिंह तमंग यांना शुभेच्छा दिल्या. सिक्किमच्या विकासासाठी केंद्र सरकार पूर्ण सहकार्य करेल, असे आश्वासन मोदी आणि राजनाथ सिंह यांनी यावेळी दिले.
प्रेम सिंह तमंग यांनी घेतली सिक्किमच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ; मोदींनी दिल्या शुभेच्छा
गेली २४ वर्ष सिक्किम येथे सिक्किम डेमोक्रेटिक फ्रंट (एसडीएफ) पक्षाची सत्ता होती. राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत एसकेएम पक्षाने ३२ पैकी १७ जागा जिंकत एसडीएफचे वर्चस्व मोडीत काढत सत्ता स्थापन केली आहे.
प्रेम सिंह तमंग मुख्यंत्रीपदाची शपथ घेताना
गेली २४ वर्ष सिक्किम येथे सिक्किम डेमोक्रेटिक फ्रंट (एसडीएफ) पक्षाची सत्ता होती. तर, सिक्किम क्रांतीकारी मोर्चाची स्थापना २०१३ साली झाली होती. एसडीएफ पक्षाचे नेते पवन कुमार चामलिंग यांनी सलग ५ वेळा मुख्यमंत्रीपद भुषवले होते. राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत एसकेएम पक्षाने ३२ पैकी १७ जागा जिंकत एसडीएफचे वर्चस्व मोडीत काढत सत्ता स्थापन केली आहे.