महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

मुनव्वर राणा यांच्या कन्या उरुसा राणा यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी घेतले ताब्यात

कवी मुनव्वर राणा यांच्या कन्या आणि काँग्रेस नेत्या उरुसा राणा यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी ताब्यात घेतले. हजरतगंजमध्ये काँग्रेस कमिटीने आयोजित केलेल्या निदर्शनात त्यांनी भाग घेतला होता.

उरुसा राणा
उरुसा राणा

By

Published : Nov 5, 2020, 4:05 PM IST

लखनऊ - हजरतगंजमध्ये काँग्रेस कमिटीने आयोजित केलेल्या निदर्शनात भाग घेतल्यामुळे कवी मुनव्वर राणा यांच्या कन्या उरुसा राणा यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी ताब्यात घेतले. महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अजय कुमार लल्लू यांच्या नेतृत्वात निदर्शन सुरू होते.

उरुसा राणा यांची बुधवारी उत्तर प्रदेश महिला काँग्रेसच्या (मध्य विभाग) प्रदेश उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. 2010मध्ये त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. काँग्रेसला विविध विषयांवर ते उघडपणे समर्थन देत आल्या आहेत. महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा ममता चौधरी यांनी उरुसा राणा यांना पत्र लिहून उमेदवारीबद्दल माहिती दिली आहे. नेहमीच काँग्रेसला एक कुटुंब मानले आहे, असे त्या म्हणाल्या. लॉकडाऊनकाळात उरुसा राणा यांची कार्यशैली चांगली आहे. कामगारांसाठी आणि विशेषत: महिलांसाठी त्यांनी स्वतंत्रपणे काम केले आहे. हे लक्षात घेता त्यांना महिला काँग्रेसमध्ये प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्त करण्यात आले आहे, असे काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष ममता चौधरी यांनी सांगितले.

उरुसा राणा यांच्या वडिलांविरोधात तक्रार दाखल -

उरुसा राणा यांचे वडिल प्रसिद्ध शायर, कवी मुनव्वर राणा यांच्याविरोधात उत्तर प्रदेशातील हजरतगंज येथे गुन्हा दाखल झाला आहे. फ्रान्सप्रकरणी राणा यांनी वक्तव्य केले होते. पोलीस दीपक पांडे यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदवण्यात आला आहे. मुनव्वर यांच्या वक्तव्याने सामाजिक सौहार्द बिघडले असल्याचा दावा तक्रारकर्त्याने केला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details