महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

मोदींनी केली वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त अटल भूजल योजनेची घोषणा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त अटल भूजल योजनेची घोषणा केली आहे.

मोदी
मोदी

By

Published : Dec 25, 2019, 6:04 PM IST

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त अटल भूजल योजनेची घोषणा केली आहे. अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची आज 95 जयंती आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह इतर नेत्यांनी 'सदैव अटल' स्मृतीस्थळावर जाऊन आदरांजली वाहिली. जयंतीनिमित्ताने मोदींनी अनेक योजनाचा शुभारंभ केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अटल भूजल योजनेसह लेह आणि मनालीला जोडणाऱ्या भुयारी मार्गाचे ‘अटल टनेल’ असे नामकरण केले आहे.काय आहे अटल भूजल योजना?जल शक्ती मंत्रालयानुसार या योजनेचा उद्देश देशातील महाराष्ट्र, गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रदेश, राजस्थान आणि उत्तर या सात राज्यातील भूजल स्तर वाढवण्यावर आहे. यात ७८ जिल्ह्यांतील 8 हजार ३५० ग्राम पंचायती समावेश असणार आहे. या योजने अंतर्गत 5 वर्षांच्या कालावधीमध्ये (२०२०-२१ ते २०१२४-२५) तब्बल 6 हजार कोटींचा खर्च केला जाणार आहे.अटल भुयारी मार्ग-लेह आणि मनालीला जोडणाऱ्या भुयारी मार्ग तयार करण्याचा निर्णय 3 जून 2000 ला घेण्यात आला होता. तेव्हा वाजपेयी हे देशाचे पंतप्रधान होते. हा जगातील सर्वांत मोठा भुयारी मार्ग आहे. त्यामुळे मनाली ते लेहमधील अंतर 46 किलोमीटर कमी होणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details