महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

'तुम्ही लढवय्ये आहात....या संकटातूनही बाहेर पडाल' मोदींचा जॉन्सन यांना दिलासा

जॉन्सन यांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. मोदींनी जॉन्सन यांच्या आरोग्यासाठीही प्रार्थना केली आहे.

By

Published : Mar 27, 2020, 8:28 PM IST

मोदी बोेरिस जॉन्सन
मोदी बोेरिस जॉन्सन

नवी दिल्ली - इंग्लडचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना पंतप्रधान मोदींनी त्यांना लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. जॉन्सन यांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. मोदींनी जॉन्सन यांच्या आरोग्यासाठीही प्रार्थना केली आहे.

तुम्ही लढवय्ये आहात. या संकटातूनही तुम्ही बाहेर पडाल. तुमच्यासह इंग्लडच्या चांगल्या आरोग्यासाठी शुभेच्छा, असे ट्विट मोदींनी केले आहे. शाही राजघराण्यातही करोनाचा शिरकाव झाल्यानंतर आता पंतप्रधानांनाही करोनाची लागण झाली आहे. “गेल्या २४ तासांपासून मला कोरोनाची लक्षणे जाणवत होती. तपासणी केली असता सकारात्मक चाचणी आली. त्यामुळे मी स्वत: ला इतरांपासून वेगळे केले आहे. मात्र, मी व्हिडिओ कॉन्फरंसिगद्वारे काम करत राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

इंग्लडमध्ये 11 हजारपेक्षा जास्त नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 558 जणांचा मृत्यू झाला आहे. तर भारतामध्ये 700पेक्षा जास्त जणांना कोरोनाची लागण झाली आहे. इराणमध्येही अनेक राजकीय नेत्यांना कोरोनाची लागण झाली होती. तसेच कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांच्या पत्नीलाही कोरोनाची लागण झाली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details