महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

पंतप्रधान मोदींचे बेर साहिब गुरुद्वारात अभिवादन, करतारपूर कॉरिडॉरचे उद्घाटन

पंतप्रधान मोदींनी गुरु नानक जयंतीनिमित्त करतारपूरला जाणाऱ्या ५०० भाविकांच्या पहिल्या बॅचला झेंडा दाखवून उद्घाटन केले. हरसिम्रत कौर, कॅप्टन अमरिंदर सिंग, शिरोमणी अकाली दलाचे प्रमुख सुखबीर सिंग बादल आणि काही मंत्री, खासदार, आमदार आदी उपस्थित होते.

पंतप्रधान मोदींचे बेर साहिब गुरुद्वारात अभिवादन

By

Published : Nov 9, 2019, 3:20 PM IST

सुल्तानपूर लोधी - शीख धर्माचे संस्थापक गुरु नानक देव यांच्या ५५० व्या जन्मदिवसानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बेर साहिब गुरुद्वारा येथे अभिवादन केले. तसेच, येथे पवित्र चादरही अर्पण केली. केंद्रीय मंत्री हरसिम्रत कौर आणि पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग हेही त्यांच्यासह उपस्थित होते.

पंतप्रधान मोदींचे बेर साहिब गुरुद्वारात अभिवादन
यानंतर नरेंद्र मोदींनी गुरदासपूर येथे जात करतारपूर् कॉरिडॉरच्या भारताच्या बाजूचे उद्घाटन केले. ४.७ किलोमीटरचा हा मार्ग पाकिस्तानातील पंजाबमधील डेरा बाब नानक मंदिरात शीख भाविकांना जाता यावे, यासाठी तयार करण्यात आला आहे.
पंतप्रधान मोदींनी गुरु नानक जयंतीनिमित्त करतारपूरला जाणाऱ्या ५०० भाविकांच्या पहिल्या बॅचला झेंडा दाखवून उद्घाटन केले. हरसिम्रत कौर, कॅप्टन अमरिंदर सिंग, शिरोमणी अकाली दलाचे प्रमुख सुखबीर सिंग बादल आणि काही मंत्री, खासदार, आमदार आदी उपस्थित होते. येथे पंतप्रधान मोदींनी शीख बांधवांप्रमाणे पगडी घातली होती. तसेच, गुरुद्वारातील लंगरमध्ये भोजनही केले.
पंतप्रधानांनी येथील पॅसेंजर टर्मिनल बिल्डिंगमधील चेक पोस्टचेही उद्घाटन केले. येथून यात्रेकरूंचा करतारपूरला जाण्याचा प्रवास सुरू होतो.याच दिवशी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनीही कॉरिडॉरच्या पाकमधील बाजूचे उद्घाटन केले. 'भारतीय यात्रेकरूंच्या भावनांखातर करतारपूर कॉरिडॉर सुरू करण्यात सकारात्मक भूमिका घेतल्याने मी पाक पंतप्रधान इम्रान खान यांचे आभार मानतो,' असे पंतप्रधान मोदी येथे बोलताना म्हणाले.
पंतप्रधान मोदींचे बेर साहिब गुरुद्वारात अभिवादन
पंतप्रधान मोदी बेर साहिब गुरुद्वारामध्ये
पंतप्रधान मोदींचे बेर साहिब गुरुद्वारात अभिवादन

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details