नवी दिल्ली- शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज(गुरुवारी) राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मुख्यमंत्री पदासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्धव ठाकरेंना ट्विटरवरून शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी उद्धव ठाकरे परिश्रमपूर्वक काम करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
पंतप्रधान मोदींनी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदाच्या दिल्या शुभेच्छा
मुख्यमंत्री पदासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्धव ठाकरेंना ट्विटरवरून शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्राच्या उज्वल भविष्यासाठी उद्धव ठाकरे परिश्रमपूर्वक काम करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
नरेंद्र मोदी
सायंकाळी ६ वाजून ४० मिनिटांनी उद्धव ठाकरेंनी राज्याचे २९ वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. मुंबईतील शिवाजी पार्कवर हा शपथविधी पार पडला. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांची महाविकास आघाडीचे सरकार महाराष्ट्रात स्थापन झाले आहे. तब्बल महिना भरापासून सुरू असलेला सत्तापेच उद्धव ठाकरेंच्या शपथविधीनंतर संपुष्टात आला.