महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

प्लास्टिकपासून हैदराबाद पालिकेने तयार केले ५५ 'ग्रीन स्ट्रीट वेडिंग झोन'

प्लास्टिकमुक्त शहर तयार करण्यासाठी हैदराबाद महानगरपालिकाने एक सकारात्मक पाऊल उचलले आहे. पालिकेने प्लास्टिकपासून शहरात ग्रीन स्ट्रीट वेडिंग झोन तयार केले आहेत. हे वेडिंग झोन हैदराबाद शहरातील हायटेक सीटी परिसरात तयार केले आहेत. यामध्ये ५५ स्टॉल असणार आहेत.

Hyderabad
दराबाद पालिकेने तयार केले ५५ 'ग्रीन स्ट्रीट वेडिंग झोन'

By

Published : Dec 27, 2019, 11:01 PM IST

Updated : Dec 27, 2019, 11:14 PM IST

हैदराबाद - प्लास्टिकमुक्त शहर तयार करण्यासाठी हैदराबाद महानगरपालिकाने एक सकारात्मक पाऊल उचलले आहे. पालिकेने प्लास्टिकपासून शहरात ग्रीन स्ट्रीट वेडिंग झोन तयार केले आहेत. हे वेडिंग झोन हैदराबाद शहरातील हायटेक सीटी परिसरात तयार केले आहेत. यामध्ये ५५ स्टॉल असणार आहेत.

प्लास्टिकपासून तयार केलेल्या ५५ स्टॉलवर खाद्यपदार्थ विकणाऱ्या विक्रेत्यांना प्रशिक्षण दिले जाणार असल्याची माहिती पालिकेच्या झोनल आयुक्त हरि चंदना दसारी यांनी दिली. हे ग्रीन स्ट्रीट वेडिंग झोन तयार करण्याचे काम गुजरातच्या एका कंपनीला देण्यात आले आहे. ५५ स्टॉल तयार करण्यासाठी ४० टन प्लास्टिकचा वापर केला जाणार आहे. हे तयार करण्यासाठी २ हजार प्लास्टिकच्या बॉटलची आवश्यकता आहे.

प्लास्टिकपासून हैदराबाद पालिकेने तयार केले ५५ 'ग्रीन स्ट्रीट वेडिंग झोन'

प्रत्येक वेडिंग झोन तयार करण्यासाठी ९० हजार रुपयांचा खर्च येणार आहे. वेन्डींग झोनच्या विक्रेत्यांना 4 महिने प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यांना अन्न सुरक्षेसंबधीचे उपाय शिकवले जाणार आहेत. तसेच प्लास्टिक वापर बंद करण्यासाठी मार्गदर्शन करण्याचेही सांगितले जाईल. या माध्यमातून हैदराबाद शहराला प्लास्टिकमुक्त करण्याचा माणस आहे.

Last Updated : Dec 27, 2019, 11:14 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details