महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

कोरोना विषाणू : केरळच्या मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना लिहिले पत्र, केली 'ही' मागणी

कोरोनाचा धोका लक्षात घेता केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहले आहे.

पिनराई विजयन
पिनराई विजयन

By

Published : Jan 27, 2020, 5:43 PM IST

तिरुअनंतपुरम -कोरोना व्हायरसच्या (विषाणू) संसर्गामुळे चीनमध्ये मृत्यूचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाचा धोका लक्षात घेता केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिले आहे. चीनच्या उहान प्रातांतील विद्यापीठात शिक्षण घेणारे भारतीय विद्यार्थी आणि कामानिमित्त असलेल्या भारतीय नागरिकांना भारतात आणण्यासाठी विशेष विमान फेऱ्यांची व्यवस्था करावी, असे त्यांनी पत्रात म्हटले आहे.

कोरोना विषाणूच्या संसर्गाने चीनमध्ये थैमान घातले असून दिवसेंदिवस या विषाणूमुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये वाढ होत आहे. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार चीनमध्ये या विषाणूमुळे ८० नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर, २,३०० हून अधिक नागरिकांना या विषाणूचा संसर्ग झाला आहे. देशातील परिस्थिती पाहता, जागतिक आरोग्य संघटनेने चीनमध्ये आणीबाणी जाहीर केली आहे. दरम्यान भारतामध्ये चीनमधून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी करण्यासाठी ही व्यवस्था केली आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या लोकांना विशेष सुरक्षेमध्ये ठेवण्यात येत आहे. रविवारपर्यंत भारतात एकूण १३७ विमानांतून आलेल्या २९,७०० प्रवाशांची तपासणी करण्यात आली आहे.कोरोना विषाणमुळे व्यक्तीला श्वसननलिकेचा संसर्ग होतो. ताप, खोकला, श्वास घेण्यास त्रास होता. यावर कोणतेही प्रभावी औषध उपलब्ध नाही. आधीच एखादा आजार असणाऱ्या रुग्णांना या विषाणूचा संसर्ग होण्याचा जास्त धोका असतो.

ABOUT THE AUTHOR

...view details