महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

शीना बोरा हत्या प्रकरण : पीटर मुखर्जीचे जामीनासाठी मुंबई उच्च न्यायालयात अपील

पीटर मुखर्जी आणि इंद्राणी मुखर्जी यांनी साथीदारांसह एप्रिल २०१२ मध्ये मुलगी शीना बोराची (वय २४) अत्यंत क्रुरपणे हत्या केली होती.

By

Published : Apr 27, 2019, 11:39 AM IST

Updated : Apr 27, 2019, 11:51 AM IST

पीटर मुखर्जी

मुंबई - शीना बोरा हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपींपैकी एक पीटर मुखर्जी यांनी जामीनासाठी मुंबई उच्च न्यायालायत अपील केले आहे. सीबीआयच्या विशेष न्यायालयाने याआधी पीटर मुखर्जींचे अपील फेटाळले होते.

पीटर मुखर्जीचे वकील शिवकांत शिवाडे यांनी सीबीआयच्या विशेष न्यायालयात अपील करताना म्हटले होते की, आम्ही वैद्यकीय कारणांसाठी जामीन मागत आहोत. पीटर मुखर्जी यांची नुकतीच बायपास सर्जरी झाली आहे. त्यांना पुन्हा जेलमध्ये पाठवणे त्यांच्या प्रकृतीसाठी धोकादायक ठरू शकते. परंतु, सीबीआयच्या विशेष न्यायालयाने ४ एप्रिल रोजी पीटर मुखर्जींचे जामीनाचे अपील फेटाळले. आता मुंबई उच्च न्यायालयात पीटर मुखर्जींनी जामीनासाठी अर्ज केला आहे.

पीटर मुखर्जी आणि इंद्राणी मुखर्जी यांनी साथीदारांसह एप्रिल २०१२ मध्ये मुलगी शीना बोराची (वय २४) अत्यंत क्रुरपणे हत्या केली होती. शीनाचा मृतदेहाची रायगड येथील जंगलात विल्हेवाट लावण्यात आली होती. पोलिसांनी याप्रकरणी तपास करत इंद्राणीचा पहिला नवरा संजीव खन्ना, चालक रायला यांनाही अटक केली होती.

Last Updated : Apr 27, 2019, 11:51 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details