महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

चिमुरडीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला ताब्यात देण्याची मागणी, गावकऱ्यांनी मारहाण केल्याने डॉक्टर पुन्हा संपावर

पश्चिम बंगालमध्ये डॉक्टरांना मारहाण झाल्याने बंगालसह देशातील डॉक्टरांनी देशव्यापी संप पुकारला होता. तो संप नुकताच मागे घेतल्यानंतर आता पुन्हा डॉक्टरांनी संप पुकारला आहे.

ग्रामस्थांची डॉक्टरांना मारहण

By

Published : Jun 19, 2019, 8:17 AM IST

नवी दिल्ली - दिल्लीत डॉक्टरांना मारहाण करत रुग्णालयाची तोडफोड करण्यात आली. दिल्लीजळील बवना परिसरातील महर्षी वाल्मिकी रुग्णालयात मंगळवारी रात्री हा प्रकरा घडला. या घटनेमुळे डॉक्टरांच्या फेडरेशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्स असोसिएशन या संघटनेने संप पुकारला आहे.

मंगळवारी सायंकाळी ६ वाजेदरम्यान एका चार वर्षिय मुलीवरील बलात्कारप्रकरणी पीडिता आणि आरोपींना पोलिसांनी तपासणीसाठी रुग्णालयात आणले होते. याच वेळी रुग्णालय परिसरात पीडितेच्या गावातील लोकांनी गर्दी केली. ग्रामस्थांनी आरोपीला त्यांच्या ताब्यात देण्याची मागणी केली. स्थानिक डॉक्टर आणि पोलिसांनी आरोपींना ग्रामस्थांच्या ताब्यात देण्यास नकार दिल्याने संतप्त ग्रामस्थांनी डॉक्टरांना मारहाण करत रुग्णालयाची तोडफोड केली.

यावेळी आक्रमक झालेल्या ग्रामस्थांनी रुग्णालयातील अनेक सुरक्षारक्षक, डॉक्टर्स यांना मारहाण करत जखमी केले. वातावरण चिघळत गेल्याने मोठ्या संख्येत पोलीस दलाला पाचारण करण्यात आले. पोलिसांनी जमाव पांगवत परिस्थिती नियंत्रणात आणली.

या घटनेमुळे फेडरेशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर असोसिएशन या डॉक्टारांच्या संघटनेने संप सुरू केला आहे. आरोपींना अटक केली जात नाही तोपर्यंत हा संप सुरूच राहील, असे फेडरेशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. सुमेध यांनी दिला.

दरम्यान, डॉक्टरांनी रुग्णालय व्यवस्थापन आणि दिल्ली पोलिसांविरोधातही धरणे आंदोलन सुरू केले आहे. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचण्यास वेळ लावला आणि प्रकरण गांभिर्याने हातळले नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details