महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Oct 28, 2020, 8:11 PM IST

ETV Bharat / bharat

जम्मू काश्मिरातील नव्या भूमी कायद्याविरोधात विरोधकांची निदर्शने

भाजपा जम्मू काश्मिरातील जनतेची दिशाभूल करत आहे, असे चौधरी यांनी सांगितले. केंद्र सरकारच्या नवीन भूमी कायद्यामुळे माफिया राज वाढेल. त्यामुळे केंद्राने हा कायदा त्वरित मागे घ्यावा, अशी मागणी विरोधी पक्षांकडून करण्यात येत आहे.

जम्मू काश्मिरातील नव्या भूमी कायद्याविरोधात विरोधकांची निदर्शने
जम्मू काश्मिरातील नव्या भूमी कायद्याविरोधात विरोधकांची निदर्शने

श्रीनगर -पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी आणि नॅशनल पँथर्स पार्टीने नवीन भूमी कायद्याविरोधात कंबर कसली आहे. केंद्राने हा कायदा रद्द करावा, अशी मागणी या पक्षांकडून करण्यात येत आहे. जम्मू काश्मीरबाहेरील व्यक्तिला या कायद्यातंर्गत जम्मू काश्मिरात कुठलीही जमीन खरेदी करता येणार नाही. गांधीनगर येथील पीडीपीच्या मुख्यालयाबाहेर केंद्र सरकारविरोधात ही निदर्शने झाली. मुख्य रस्त्यावर मार्च काढण्यासाठी निघालेल्या आंदोलकांना पोलिसांनी रोखले.

'मी निवडणूक लढवण्यास इच्छूक नसून तिरंगा हातात घेण्यातही मला रस नाही जोपर्यंत गेल्यावर्षी ५ ऑगस्टला जम्मू काश्मिरात कलम ३७० संदर्भात घेतलेला निर्णय मागे घेतला जात नाही, असे वक्तव्य मेहबुबा मुफ्ती यांनी पत्रकार परिषदेत केले होते. १४ महिन्यांची गृहकैद संपल्यानंतर त्या पत्रकारांशी संवाद साधत होत्या. जम्मू काश्मीरचा स्वतंत्र ध्वज बहाल झाल्यावरच तिरंगा हातात घेईल असेही मुफ्ती म्हणाल्या होत्या. त्यांच्या या वक्तव्यानंतर बरेच वादंग निर्माण झाले होते.

भाजपच्या जनविरोधी धोरणांविरोधात आमचे आंदोलन आहे. विशेषत: केंद्र सरकारच्या नवीन भूमी कायद्यांविरोधात आमची निदर्शने आहेत. ही जमीन आमच्या येणाऱ्या पिढ्यांशी संबंधित आहे आणि भाजपा जम्मू काश्मिरातील जनतेची दिशाभूल करत आहे, असे चौधरी यांनी सांगितले. केंद्र सरकारच्या नवीन भूमी कायद्यामुळे माफिया राज वाढेल. त्यामुळे केंद्राने हा कायदा त्वरित मागे घ्यावा, अशी मागणी विरोधी पक्षांकडून करण्यात येत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details