महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

हिमाचल प्रदेश : लाहौल व्हॅलीमध्ये हिम महोत्सवाचे आयोजन

गौशाल गावात दोरीखेच स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंत्री डॉ. रामलाल मारकंडा यांची उपस्थिती होती. यावेळी ग्रामस्थांनी पारंपारिक पद्धतीने त्यांचे स्वागत केले.

organizing-snow-festival-in-lahaul-valley-in-himachal-pradesh
हिमाचल प्रदेश : लाहौल व्हॅलीमध्ये हिम महोत्सवाचे आयोजन

By

Published : Jan 30, 2021, 3:40 PM IST

लाहौल स्पीती (हिमाचल प्रदेश) - लाहौल व्हॅलीमध्ये हिम महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी गौशाल गावात दोरीखेच स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंत्री डॉ. रामलाल मारकंडा यांची उपस्थिती होती. यावेळी ग्रामस्थांनी पारंपारिक पद्धतीने त्यांचे स्वागत केले. तसेच अशा स्पर्धा आयोजित करण्यासाठी गौशालमध्ये सर्व मूलभूत सुविधा असून येत्या काळात येथे जिल्हास्तरीय 'टग ऑफ वॉर' स्पर्धा आयोजित केल्या जातील, अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली.

हिम महोत्सवाचे आयोजन

लाहौल खोरे एक प्रमुख पर्यटन केंद्र म्हणून उदयास -

या दरम्यान, -15 डिग्री तापमानामध्ये महिलांची दोरीखेच स्पर्धा आकर्षणाचे केंद्र होते. यावेळी गावातील महिलांनी एकमेकांना मात करण्यासाठी खूप प्रयत्न केला. तसेच ग्रामस्थांनी मुख्यमंत्र्यांसमोर विविध कलेचे सादरीकरण केले. ज्यात मंत्री मरकांडा यांनीही भाग घेतला होता. येत्या काळात लाहौल खोरे एक प्रमुख पर्यटन केंद्र म्हणून उदयास येईल. यासाठी स्थानिक लोकांचा शासन आणि प्रशासनात सहभाग असणे आवश्यक आहे. कमी खर्चात होमस्टे बांधून पर्यटनाला चालना देता येईल. तसेच यापासून चांगले उत्पन्न मिळवू शकते. यासाठी सरकारने होमस्टे नोंदणीची प्रक्रियाही मोठ्या प्रमाणात सोपी केली असल्याची प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली.

हेही वाचा - महात्मा गांधींचे विचार लाखो लोकांना प्रेरणा देत राहतील, मोदींचे ट्विट

ABOUT THE AUTHOR

...view details