महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

काँग्रेसची लढाई विरोधकांशी की आपल्याच अंतर्गत नेतृत्वाशी?

काँग्रेसमध्ये सध्या सुरु असलेला तरुण नेतृत्वामधील आणि ज्येष्ठ नेत्यांमधील वाद हा येणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसला घातक ठरू शकतो, असे मत काँग्रेसचेच नेते व्यक्त करत आहेत. यासंदर्भात काँग्रेसच्या सध्याच्या परिस्थितीचा आढावा घेतला आहे ज्येष्ठ पत्रकार अमित अग्निहोत्री यांनी.

Congress party current situation

By

Published : Oct 15, 2019, 8:45 PM IST

काँग्रेसमध्ये सध्या सुरु असलेला तरुण नेतृत्वामधील आणि ज्येष्ठ नेत्यांमधील वाद हा येणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसला घातक ठरू शकतो, असे मत काँग्रेसचेच नेते व्यक्त करत आहेत. एका ज्येष्ठ काँग्रेस नेत्याने नाव न सांगण्याच्या अटीवर ही माहिती सांगितली. हरियाणा आणि महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका या २०१९च्या लोकसभा निवडणुकांमधून पक्षाला सावरण्याची चांगली संधी होती. मात्र, या अंतर्गत गटबाजीमुळे पुन्हा भाजपलाच फायदा होणार असे दिसत आहे, असेही ते म्हणाले.

असेच मत असणाऱ्या आणखी काही काँग्रेस नेत्यांनी हरियाणा काँग्रेसचे माजी युनिट अध्यक्ष अशोक तन्वर यांचे उदाहरण दिले. अशोक तन्वर हे दलित नेते आहेत. हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भूपिंदर सिंग हूडा यांच्यामुळे तन्वर यांना बाजूला केले गेले. यामुळे तणावात येऊन तन्वर यांनी पक्षाचा राजीनामा दिला. भूपिंदर सिंग हूडा यांनी हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांच्याविरोधात प्रचारसभा घेतल्या होत्या.

हरियाणा निवडणुकांचे नियोजन करणाऱ्या एका काँग्रेस रणनीतीकाराच्या मते, काँग्रेससाठी हूडा हेच योग्य पर्याय होते. कारण, हूडा हे एका विशिष्ट जातीच्या लोकांमध्ये बरेच लोकप्रिय आहेत, आणि हरियाणामधील जवळपास २५ टक्के मतदार हे त्या जातीचे आहेत.

हेही वाचा : आयोध्या वाद : उद्या सुनावणीचा शेवटचा दिवस, पुढील महिन्यात निर्णय देण्याची शक्यता

महाराष्ट्रामध्ये देखील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी राजीनामा दिल्यानंतर, बाळासाहेब थोरातांना राज्य युनिटचे प्रमुखपद देण्यात आले. मुंबई काँग्रेसचे माजी प्रमुख संजय निरूपम यांनीदेखील काँग्रेसमधील वरिष्ठ नेते आपल्या विरोधात काम करत आहेत असा जाहीर आरोप केला होता.

२०१४च्या लोकसभा निवडणुकांमध्ये ४८ पैकी २ जागा मिळालेल्या काँग्रेसला २०१९च्या लोकसभा निवडणुकांमध्ये केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले होते. त्यानंतर काँग्रेसचे वरिष्ठ नेते खडबडून जागे झाले होते. लोकसभेमधील काँग्रेसची कामगिरी पाहता, काँग्रेस त्यापेक्षा चांगली कामगिरी करून या निवडणुकांमध्ये राज्यभरात आपला ठसा उमटवेल अशी आम्हाला आशा आहे, असे एक काँग्रेस रणनीतीकार म्हणाले.

हरियाणामध्ये काँग्रेसला १० जागाही जिंकता आल्या नव्हत्या. रोहतकमधून उभा असलेला हूडा यांचा मुलगा दिपेंदर याला आपली हक्काची जागाही गमवावी लागली होती.

हेही वाचा : मनोहर लाल खट्टर यांचे वादग्रस्त विधान, सोनिया गांधींना म्हणाले...'मेलेली उंदरीण'

राहुल यांचा पाठिंबा लाभलेले त्रिपुरा काँग्रेस प्रमुख प्रद्योत माणिक्य आणि झारखंडचे माजी काँग्रेस प्रमुख अजोय कुमार यांची परिस्थितीदेखील तन्वर किंवा निरूपम यांच्याहून वेगळी नाही. राहुल गांधी यांनी पक्षाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर सोनिया गांधी यांना पक्षाचे अंतरिम अध्यक्षपद देण्यात आले. त्यामुळे साहजिकपणे राहुल यांचा वरदहस्त लाभलेल्या नेत्यांना वाली न राहिल्यामुळे, जुन्या नेत्यांना पुन्हा बळ मिळाले.

पक्षातील काही नेत्यांच्या मते, राहुल गांधींना पारंपारिक पद्धतींपेक्षा वेगळ्या पद्धतीने पक्षाची वाटचाल करायची होती. मात्र, त्याला काँग्रेसमधूनच मोठ्या प्रमाणात विरोध होत होता.

२०१९च्या लोकसभा निवडणुकांनंतरच राहुल गांधी यांनी काँग्रेच्या पक्षाध्यक्ष पदाचा राजीनामा देण्याचा प्रस्ताव मांडला होता. त्यांना आशा होती की काँग्रेस कार्यकारिणी समिती हे होऊ न देण्यासाठी त्यांनी सुचवलेल्या मार्गाने पक्षाची वाटचाल करण्यास अनुमती देईल. मात्र, तसे काही झाले नाही. उलट, राहुल गांधी यांनी राजीनामा देण्याचा प्रस्ताव मांडल्यावर पक्षाच्या राष्ट्रीय मुख्यालयाबाहेर पक्षाच्या तरुण कार्यकर्त्यांनी निदर्शने केली होती. ज्याद्वारे काँग्रेसमधील जुन्या आणि नव्या नेत्यांमधील वाद हा चव्हाट्यावर आला.

काँग्रेसमध्ये सुरु असलेला जुन्या आणि नव्या नेतृत्वामधील हा वादच आता काँग्रेसला घातक ठरत आहे. त्यामुळे, काँग्रेसला आपल्या विरोधकांचा सामना करण्याआधी आपलाच अंतर्गत वाद मिटवून घेणे गरजेचे आहे तरच काँग्रेस आपल्या विरोधकांचा सामना करू शकेल.

हेही वाचा : हरियाणा विधानसभा: पाकिस्तानला जाणारं पाणी शेतकऱ्यांच्या घरापर्यंत आणणार - पंतप्रधान मोदी

(हा लेख ज्येष्ठ पत्रकार अमित अग्निहोत्री यांनी लिहिला आहे.)

ABOUT THE AUTHOR

...view details