नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीसोबतच आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, ओडिशा आणि सिक्किममध्ये विधानसभेसाठी मतदान झाले. ओडिशामध्ये लोकसभा निवडणुकासोबत चार टप्प्यात विधानसभेसाठी मतदान प्रक्रिया घेण्यात आली. ओडिशामध्ये विधानसभेच्या १४६ जागा आहेत. यापैकी बीजू जनता दलाने ११२ जागा जिंकल्या. भाजपने २१ जागांवर विजय मिळवला तर काँग्रेसने ११ जागा पटकावल्या.
सध्या नवीन पटनायक यांचा पक्ष बीजू जनता दल (बीजद) हा सत्तेत आहे. २०१४ मध्ये झालेल्या निवडणुकीत बीजू जनता दलाने ११७ जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवले होते. नवीन पटनायक यांनी लागोपाठ चारवेळा मुख्यमंत्रीपद मिळवले होते.
०४.३० pm - बीजू जनता दल तीन जागांवर विजयी, तर १०६ जागांवर आघाडी मिळाली आहे. भाजप एका जागेवर विजयी झाले असून २१ जागांवर पुढे आहे
०२.०० pm - बीजू जनता दलाची १०७ जागांवर आघाडी, भाजप २२ जागांवर पुढे तर काँग्रेस १२ जागांवर पुढे. बीजू जनता दल २ जागांवर विजयी झाला आहे.