नवी दिल्ली- विना अनुदानित गॅस सिलिंडरच्या किमतीमध्ये केंद्र सरकारने ६२.५० रुपयांनी कपात केली आहे. ३१ जुलैपासून नवा दर लागू करण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात गॅसच्या किंमती उतरल्याने सरकारने हा निर्णय घेतला आहे. किमती कमी झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
खूशखबर! विना अनुदानित गॅस सिंलेडरच्या किमतीमध्ये कपात
दर कमी झाल्यामुळे १४.३ किलोचा गॅस सिलेंडर आता ५७४.५० रुपयांना मिळणार आहे. बुधवार ३१ जुलैच्या रात्रीपासून नवा दर लागू होणार असल्याची माहिती 'इंडीयन ऑईल कॉर्पोरेश'नने दिली आहे.
गॅस
वर्षाला १२ सिलेंडरचा कोटा पूर्ण झाल्यानंतर घेण्यात येणाऱ्या गॅसवर नवा दर लागू होणार आहे. दर कमी केल्यामुळे १४.२ किलोचा गॅस सिलेंडर आता ५७४.५० रुपयांना मिळणार आहे. बुधवार ३१ जुलैच्या रात्रीपासून नवा दर लागू होणार असल्याची माहिती इंडीयन ऑईल कॉर्पोरेशनने दिली आहे.
याआधीही जुलै महिन्यात विना अनुदानित गॅस सिलेंडरच्या किमतीत १०० रुपयांची कपात करण्यात आली आहे. त्यामुळे विनाअनुदानित गॅसच्या किंमतीत एकून १६३ रुपयांची कपात झाली आहे.