नवी दिल्ली - आज आंतरराष्ट्रीय महिला दिन आहे. या दिवशी सर्वच स्तरातील महिलांच्या कार्याचा गौरव होत आहे. नारी शक्तीचा हा सन्मान आहे. या दिनाचे निमित्त साधून दिल्ली राजधानी क्षेत्रातील नोयडा पोलिसांनी आंतरराष्ट्रीय स्तरावरील नेमबाज अंशिका सत्येंद्रला एक दिवस पोलीस उपआयुक्त पदाचा कारभार सांभाळण्याची संधी दिली आहे. यातून नोयडा पोलिसांनी महिला सक्षमीकरणाचा संदेश समाजामध्ये दिला.
अंशिकाला बनली एक दिवस पोलीस अधिकारी हेही वाचा -VIDEO: कॉलेजची डिग्री नव्हे तर, कौशल्य तुम्हाला यश मिळवून देते
पोलीस उपायुक्त पदाचा कारभार हाती घेतल्यानंतर अंशिका सत्येंद्र हीने एका मॉलच्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला. भारतीय पोलीस सेवेत (आयपीएस) जाण्याचे लक्ष्य असून त्यासाठी मी कठोर मेहनत घेत आहे, असे अंशिका म्हणाली.
हेही वाचा -जागतिक महिला दिन : 'या' महिलांना राष्ट्रपतींनी नारी शक्ती पुरस्कारने गौरवले
नेमबाजीमध्ये अंशिकाला आंतरराष्ट्रीय स्तरावर सुवर्ण पदक मिळाले आहे. एक दिवसासाठी एसीपी झाल्यामुळे मला खूप आनंद झाला आहे. ही संधी प्रत्येकाला मिळत नाही. नोयडा येथील मेट्रो स्थानक १८ ची पाहणी देखील तिने केली. एक दिवस महिलांना मदत करण्याचा प्रयत्न अंशिका करणार आहे.