लखनौ - केंद्रीय मंत्री मेनका गांधी यांनी भाजपला अमेठी आणि वायनाड या दोन्ही मतदारासंघांत विजय मिळेल, असे म्हटले आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी अमेठी आणि वायनाड या दोन्ही लोकसभा मतदार संघांतून लढणार असल्याचे काँग्रेसने जाहीर केले आहे. यावर बोलताना 'राहुल घाबरलेत का ते माहीत नाही; मात्र भाजपच या दोन्ही जागा जिंकणार,' असे मेनका गांधींनी म्हटले आहे.
राहुल घाबरलेत का, ते माहीत नाही; मात्र भाजपच दोन्ही जागा जिंकणार - मेनका गांधी
'राहुल यांनी कुठून लढावे, हा त्यांचा प्रश्न आहे. मात्र, अमेठी आणि वायनाड या दोन्ही मतदार संघांत भाजपलाच विजय मिळेल आणि राहुल गांधींना पराभवाचा सामना करावा लागेल,' असे मनेका यांनी म्हटले आहे.
राहुल गांधी उत्तर प्रदेशातील अमेठीसह केरळातील वायनाड लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवणार असल्याचे रविवारी काँग्रेसने जाहीर केले होते. उत्तर आणि दक्षिणेतील एकता अधिक बळकट करण्यासाठी राहुल या दोन्ही मतदार संघांतून लढणार आहेत, असे काँग्रेसने म्हटले होते. यानंतर 'राहुल यांनी कुठून लढावे, हा त्यांचा प्रश्न आहे. मात्र, या दोन्ही मतदार संघांत भाजपलाच विजय मिळेल आणि राहुल गांधींना पराभवाचा सामना करावा लागेल,' असे मेनका यांनी म्हटले आहे. मेनका सुलतानपूर येथून लढणार आहेत.
राहुल गांधी दोन वेगवेगळ्या मतदार संघांमधून निवडणूक लढवत असल्याचे प्रथमच घडत आहे. वायनाड येथे २३ एप्रिलला आणि अमेठीमध्ये ६ मे रोजी मतदान होणार आहे. २३ मे रोजी मतमोजणी होईल.