नवी दिल्ली -राम मंदिर, बाबरी मशीद जमीन वादाप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात आज (बुधवार) सुनावणी झाली. त्यामुळे देशात कुठल्याच प्रकारच्या चुकीच्या गोष्टींना प्रोत्साहन मिळू नये म्हणून राष्ट्रीय प्रसारण मानक प्राधिकरणने वाहिन्यांना निर्देशपत्र जारी केले आहे.
'अयोध्या वाद प्रकरणाच्या सुनावणीवर कोणतेही अंदाज व्यक्त करू नका'
राम मंदिर बाबरी मशीद जमीन वादाप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात आज ( बुधवार) सुनावणी झाली.
न्यायालयाच्या कारवाईवर कोणत्याच प्रकारचे अंदाज लावू नये, फक्त सुनावणीशी संबधीत माहिती द्यावी, बाबरी मशीद पाडतानाचे फुटेज वापरू नये, याचबरोबर कोणत्याही बाजूने निकाल लागल्यास त्या पक्षाचा जल्लोषाचे प्रसारण करू नका, अशा सूचना राष्ट्रीय प्रसारण मानक प्राधिकरणने परिपत्रक जारी करून दिल्या आहेत.
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश रंजन गोगाई यांनी सुनावणी १७ ऑक्टोबरपर्यंत संपवण्याचे आदेश दोन्ही पक्षकारांना दिले होते. दरम्यान या प्रकरणाची सुनावणी आज पूर्ण झाली आहे. अयोध्या खटला निकालाच्या पार्श्वभूमीवर शहरामध्ये १० डिसेंबरपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच सुरक्षा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
TAGGED:
Ayodhya land dispute