नवी दिल्ली - ट्विटरवर हाथरस पीडितेची ओळख उघड केल्याबद्दल एनसीडब्ल्यूने भाजप आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय, कॉंग्रेस नेते दिग्विजय सिंह आणि अभिनेत्री स्वरा भास्कर यांच्याकडून स्पष्टीकरण मागितले आहे. राष्ट्रीय महिला आयोगानेही त्यांना या पोस्ट त्वरित हटवण्याचे आणि भविष्यात अशी पोस्ट सामायिक करणे टाळण्याचे निर्देश दिले आहेत. एनसीडब्ल्यूने याविषयी मंगळवारी ट्विट केले आहे.
भास्कर, मालवीय आणि सिंह यांना स्वतंत्र नोटिसा देताना 'सामूहिक बलात्काराच्या घटनेतील पीडितेचे छायाचित्र असलेली अनेक ट्विटस आपल्या निदर्शनास आली आहेत,' असे एनसीडब्ल्यूने म्हटले आहे.
हेही वाचा -हाथरस बलात्कार धक्कादायक आणि असामान्य घटना - सर्वोच्च न्यायालय
'या बाबी लक्षात घेता, आपल्याला ही माहिती मिळाल्यावर आयोगास समाधानकारक स्पष्टीकरण देण्यात यावे. तसेच, सोशल मीडियावर अशा प्रकारचे छायाचित्र/व्हिडिओ प्रसारित करणे टाळणे, आताच्या वेळी ते तातडीने काढून टाकणे आणि पुन्हा अशा कृतीपासून दूर रहाणे आवश्यक आहे. कारण ते आपल्या फॉलोअर्सद्वारे मोठ्या प्रमाणात प्रसारित केले गेले आहे. असे करणे सध्याच्या कायद्याने प्रतिबंधित आहे,' एनसीडब्ल्यूने दिलेल्या नोटीसमध्ये म्हटले आहे.
उत्तर प्रदेशातील हाथरस गावात एका दलित महिलेवर 14 सप्टेंबरला चार जणांनी सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप आहे. प्रकृती खालावल्यानंतर तिला दिल्लीच्या सफदरजंग रूग्णालयात हलविण्यात आले. मोठ्या प्रमाणात जखमी झाल्याने तेथेच तिचा मृत्यू झाला. रात्रीच्या वेळी तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. स्थानिक पोलिसांनी बळजबरीने तिच्यावर रात्रीच अंत्यसंस्कार केले, असे तिच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे. तर, कुटुंबीयांच्या इच्छेनुसारच तिच्यावर अंत्यसंस्कार झाल्याचे स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. दरम्यान, या घटनेतील पीडितेला न्याय मिळावा या मागणीसाठी देशभरात वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांकडून निदर्शने झाली.
हेही वाचा -बॉलिवूडच्या माध्यमातून पाकिस्तान भारतात ड्रग्ज 'नेटवर्क' बनवतेय , भाजपा खासदाराचा आरोप