रायपूर- गडचिरोली आणि दक्षिण बस्तर भागातील माओवाद्यांनी 'पेलोड ड्रोन कॅमेऱ्याचा वापर सुरू केल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाली आहे. छत्तीसगडमधील पालोडी सीआरपीएफ छावणीवर रात्रीच्यावेळी आकाशामध्ये चमकदार वस्तू दिसून आली आहे, हा प्रकाश ड्रोनच्या कॅमेऱ्याचा असावा, असा अंदाज सुरक्षा दलांनी व्यक्त केला आहे. ड्रोनचा वापर सुरक्षा दलांवर बॉम्ब हल्ला करण्यासाठी वापरला जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
हेही वाचा - अरुणाचलमध्ये सर्वांत मोठा 'हिम विजय' सुरू, युद्ध अभ्यासाचा चीनने केला विरोध
सीआरपीएफ जवानांनी जंगलामध्ये अनेक भागामध्ये ड्रोन जातानाही पाहिले आहेत. सुकमा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक शलभ सिन्हा यांनीही ड्रोन दिसल्यावरून शंका उपस्थित केली आहे. याप्रकरणी विविध विभागांद्वारे तपास करण्यात येत आहे, असे त्यांनी सांगितले.