महाराष्ट्र

maharashtra

By

Published : May 17, 2020, 7:15 PM IST

Updated : May 17, 2020, 7:55 PM IST

ETV Bharat / bharat

३१ मेपर्यंत असणार 'चौथा लॉकडाऊन'; नियमावली जाहीर...

Nationwide lockdown extended till May 31 to contain COVID-19 spread: NDMA
३१ मेपर्यंत असणार 'चौथा लॉकडाऊन'; नियमावली जाहीर...

19:20 May 17

३१ मेपर्यंत असणार 'चौथा लॉकडाऊन'; नियमावली जाहीर...

  • देशभरात काय राहणार बंद..?
  1. आंतरराज्यीय आणि आंतरराष्ट्रीय प्रवासी विमान वाहतूक.
  2. मेट्रो रेल्वे सेवा.
  3. शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था.
  4. हॉटेल, रेस्टॉरंट आणि याप्रकारच्या इतर सेवा. (क्वारंटाईन सेंटर आणि वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित राहण्याच्या सुविधा; तसेच रेल्वे स्थानक, बसस्थानक आणि विमानतळांवर सुरू असलेले रेस्टॉरंट इत्यादी वगळता.) (तसेच हॉटेलांना होम डिलिवरीसाठी स्वयंपाकघर सुरू ठेवण्याची मुभा.)
  5. चित्रपटगृहे, शॉपिंग मॉल, व्यायामशाळा, जलतरण तलाव, थीम पार्क, एंटरटेनमेंट पार्क, बार, ऑडिटोरियम, नाटकगृहे, सभागृहे आणि तत्सम ठिकाणे.
  6. सर्व सार्वजनिक, राजकीय, क्रीडा, मनोरंजन, शालेय, सांस्कृतिक, धार्मिक किंवा इतर कार्यक्रम ज्यांना गर्दी होऊ शकते.
  7. धार्मिक स्थळे (केवळ लोकांसाठी बंद राहतील)
  • काय होणार सुरू..?
  1. आंतरराज्यीय प्रवासी वाहतूक (गाड्या आणि बस) करण्यास परवानगी, मात्र दोन्ही राज्यांची परवानगी आवश्यक. तसेच, कंटेन्मेंट झोनमध्ये वाहतूकीस मनाई.
  2. जिल्हांतर्गत प्रवासी वाहतूक (गाड्या आणि बस) करण्यास परवानगी, मात्र राज्यसरकारला वेगळा निर्णय घेण्याची मुभा. तसेच, कन्टेन्मेंट झोनमध्ये मनाई.
  • राज्यातील रेड, ग्रीन आणि ऑरेंज झोनची व्याख्या ठरवण्याची राज्यसरकारला मुभा.

कन्टेन्मेंट झोन्समध्ये केवळ अत्यावश्यक सेवा सुरू राहतील. तसेच, कन्टेन्मेंट झोनमधील लोकांना बाहेर, किंवा बाहेरील लोकांना आत जाण्याची परवानगी मिळणार नाही. (अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या व्यक्ती वगळता.) यासोबतच, कन्टेन्मेंट झोनमध्ये युद्धपातळीवर लोकांचे सर्वेक्षण केले जाईल.

19:20 May 17

  • नाईट कर्फ्यू..

नव्या नियमावलीनुसार देशात सायंकाळी सात ते सकाळी सातपर्यंत कर्फ्यू लागू करण्यात येणार आहे. यादरम्यान अत्यावश्यक सेवा पुरवणारे लोक वगळता, इतरांना बाहेर फिरण्यास मज्जाव असेल. आपापल्या प्रांतामध्ये कलम १४४ लागू करण्याचे स्थानिक प्रशासनाला निर्देश देण्यात आले आहेत.

19:20 May 17

19:17 May 17

19:06 May 17

चौथ्या लॉकडाऊनची घोषणा; ३१ मेपर्यंत असणार लागू..

चौथ्या लॉकडाऊनची घोषणा; ३१ मेपर्यंत असणार लागू..

नवी दिल्ली - देशातील तिसरा लॉकडाऊन संपत असतानाच, चौथा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिलेल्या माहितीनुसार ३१ मेपर्यंत हा लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे.

पंतप्रधानांनी १२ तारखेला आपल्या भाषणात सांगितल्याप्रमाणे या लॉकडाऊनला वेगळे नियम लागू करण्यात येणार आहेत. केंद्रीय गृहमंत्रालयाने याबाबतची नियमावली जाहीर केली आहे.

Last Updated : May 17, 2020, 7:55 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details