नवी दिल्ली - भारतीय जनता पक्षाची आज संसदीय दलाची बैठक पार पडली. बैठकीत नरेंद्र मोदींनी कठोर भूमिका घेतली. मोदींना नवनिर्वाचित खासदार आणि आमदारांना मर्यादेत राहण्याचा सल्ला दिला. यावेळी मोदींनी आकाश विजयवर्गीय यांच्यावर नाव न घेता टीका केली.
मुलगा कोणाचाही असो, पक्षातून त्याची हकालपट्टी करणार - नरेंद्र मोदी
इंदौर महानगरपालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाकडून कारवाई सुरू होती. किरकोळ बाचाबाची झाल्यानंतर आकाशने हातात बॅट घेऊन पालिकेच्या अधिकाऱ्यावर हल्ला केला होता.
मोदी म्हणाले, कोणाचाही मुलगा असो त्याला मनमानी करण्याचा अधिकार नाही. नवनिर्वाचित खासदार आमदारांनी त्यांचे आचरण नीट ठेवताना आपली मर्यादा ओळखून काम करावे. समाजात वावरताना सर्वांना आपल्या मर्यांदा माहित असल्या पाहिजेत. त्यासोबतच आपल्या वागणेही नियंत्रित ठेवले पाहिजे. कोणाच्या वागण्यामुळे पक्षाचे नाव खराब होत असेत तर ते आम्हाला मान्य नाही.
इंदौर महानगरपालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाकडून कारवाई सुरू होती. ही कारवाई सुरू असतानाच वाद झाला. यादरम्यान भाजप नेते कैलाश विजयवर्गीय यांचा मुलगा आणि आमदार आकाश विजयवर्गीय तिथे दाखल झाला. किरकोळ बाचाबाची झाल्यानंतर आकाशने हातात बॅट घेऊन पालिकेच्या अधिकाऱ्यावर हल्ला केला.पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने या अधिकाऱ्याची सुटका झाली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आकाश याच्यासह ११ जणांवर गुन्हा दाखल करुन आकाश यांना अटक करण्यात आली होती. यानंतर, जामिनावर त्याची सुटका करण्यात आली होती.