महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

नारायण साईला शिक्षा झाल्याने पत्नी जानकी हरपलानी यांनी व्यक्त केला आनंद

नारायण साई याच्या पत्नीने साईविरोधात न्यायालयात याचिका दाखल केलेली आहे. मलादेखील न्यायालयात न्याय मिळेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

नारायण साईला शिक्षा झाल्याने पत्नी जानकी हरपलानी यांनी व्यक्त केला आनंद

By

Published : May 1, 2019, 12:58 PM IST

इंदूर- बलात्कार प्रकरणी आसाराम याचा मुलगा नारायण साई याला न्यायलयाने जन्मठेपेच्या शिक्षा सुनावली आहे. या निर्णयाचे नारायण साई याची पत्नी जानकी हरपलानी यांनी स्वागत केले असून त्याबाबत त्यांनी आनंद व्यक्त केला. नारायण साई आणि आसाराम या दोघांनी अत्याचार केलेल्या त्या सर्व पीडित महिलांना न्यायालयाच्या या निर्णयामुळे खरा न्याय मिळाला असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

धर्माच्या नावाने आसाराम आणि नारायण साई याने महलांचे शोषण केले. त्याने अत्याचाराची परिसिमा गाठली होती. श्रध्दाळू महिला आसाराम आणि नारायण साई याला आपला पिता, भाऊ आणि गुरू मानत असे. मात्र, या दोघांनी त्यांचा विश्वासघात केला. या दोघांनीही महिलांच्या अब्रूवर घाला घातला असून ते एक मोठे पाप आहे.

न्यायालयाच्या या निर्णयामुळे त्या लोकांनाही धडा मिळेल जे धर्माच्या नावाने महिलांचे शोषण करतात. माझा न्यायपालिकेवर पूर्ण विश्वास होता. न्यायालयाच्या या निर्णयामुळे न्याय, धर्म आणि सत्याचा विजय झाला आहे, असे जानकी यांनी म्हटले आहे. तसेच त्यांनीही साईविरोधात न्यायालयात याचिका दाखल केलेली आहे. मलादेखील न्यायालयात न्याय मिळेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. दरम्यान, नारायण साई याला सुरत सत्र न्यायालयाने बलात्कार प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तसेच एक लाखांचा दंडही ठोठावला आहे. या प्रकरणात आसाराम बापूदेखील शिक्षा भोगत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details