महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

नैनीतालमध्ये मोफत राशनसाठी रांगेत लागलेल्या नेपाळी नागरिकांकडे आढळली इतकी रोख रक्कम

नैनीतालमधील मल्लीताल पोलीस रेशन वितरीत करत असताना त्यांना काही नेपाळी लोक आढळले. पोलिसांना त्यांच्यावर संशय आल्याने त्यांची चौकशी करण्यात आली. चौकशीत त्या नेपाळी व्यक्तीजवळ ४० हजार रुपये आढळले.

nainital-police-found-nepalese
नैनीतालमध्ये मोफत राशनसाठी रांगेत लागलेल्या नेपाळी नागरिकांकडे आढळली रोख रक्कम

By

Published : Apr 13, 2020, 12:18 PM IST

नैनीताल(उत्तराखंड) - देशभरात कोरोनाचे संक्रमण दिवसेंदिवस वाढत आहे. या कठीण काळात सर्वजण एक-दुसऱ्यांना मदत करण्यासाठी समोर येत आहेत. मात्र, काही लोक असेही आहेत, ज्यांच्याकडे खाण्या-पिण्याच्या सर्व सोई आहेत. तरीही मोफत जेवणाच्या रांगेत लागताहेत. असा प्रकार नैनीतालमध्ये पाहायला मिळाला आहे.

नैनीतालमध्ये मोफत राशनसाठी रांगेत लागलेल्या नेपाळी नागरिकांकडे आढळली रोख रक्कम

मिळालेल्या माहितीनुसार, नैनीतालमधील मल्लीताल पोलीस रेशन वितरीत करत असताना त्यांना काही नेपाळी लोक आढळले. पोलिसांना त्यांच्यावर संशय आल्याने त्यांची चौकशी करण्यात आली. चौकशीत त्या नेपाळी व्यक्तीजवळ ४० हजार रुपये आढळले. दरम्यान,पोलिसांनी सोबत असलेल्या दुसऱ्याचीदेखील चौकशी केली. त्याच्याजवळही पोलिसांना तब्बल ३८ हजार रुपये रोख आढळले. तिथे उपस्थित सर्व नेपाळी लोकांची चौकशी करण्यात आली. सर्वांकडे रोख रक्कम आढळली. या लोकांना पोलिसांनी समज देऊन सोडून दिले.

ABOUT THE AUTHOR

...view details