मुंबई - पावसामुळे मुंबईमधील बऱ्याच रेल्वे स्थानकांवर पाणी साचले आहे. त्यामुळे, रेल्वे सेवा ठप्प झाली आहे. मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते ठाणे पर्यंत जाणाऱ्या गाड्या थांबविण्यात आल्या आहेत.
मुंबईत पावसाच्या जोरदार पुनरागमनाने रेल्वे सेवा पुन्हा ठप्प, 'या' गाड्या झाल्या रद्द
गणरायाच्या आगमनासोबतच मुंबईत पावसाचे पुनरागमन झाले आहे. सततच्या पावसामुळे मुंबईत पुन्हा एकदा ठिकठिकाणी पाणी साचले आहे. याचा फटका मुंबईतील वाहतुकीला आणि रेल्वे सेवेला बसला आहे.
यासोबतच, हार्बर रेल्वेच्या सीएसएमटी ते वडाळा, सीएसएमटी ते अंधेरी, सीएसएमटी ते गोरेगाव आणि वडाळा ते वाशी या मार्गांवरील सेवाही ठप्प झाली आहे.
लांब पल्ल्यांच्या रेल्वे गाड्यांपैकी, मध्य रेल्वेच्या पाच गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. यामध्ये, पश्चिम एक्सप्रेस (१२९२१), दिल्ली गरीबरथ (१२२१६), बांद्रा-दिल्ली एक्सप्रेस (२२९४९), हरिद्वार एक्सप्रेस (२२९१७) आणि रणकपूर एक्सप्रेस (१४७०८) या गाड्यांचा समावेश आहे.
मुंबईत गणरायाच्या आगमनासह पावसाचेही आगमन झाले आहे. त्यामुळे, अनेक ठिकाणी पाणी साचून वाहतुकीची समस्या निर्माण झाली आहे. यासोबतच रेल्वे स्थानकांवर पाणी साचल्यामुळे काही ठिकाणी वाहतूक संथगतीने सुरु आहे.