महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

मध्यप्रदेशात कोरोनाचे 411 रुग्ण; तर 33 जणांचा मृत्यू

'नागरिकांचा जीव सर्वात जास्त महत्त्वाचा आहे. अर्थव्यवस्था पुन्हा उभी करता येऊ शकते. पण जर नागरिकांचा जीव जात असेल तर त्यांना आपण माघारी आणू शकत नसल्याचे मत शिवराज सिंह चौहान यांनी व्यक्त केले आहे.

शिवराज सिंह चौहान
शिवराज सिंह चौहान

By

Published : Apr 9, 2020, 10:15 PM IST

भोपाळ - मध्यप्रदेशात कोरोनाचे 411 रुग्ण आढळून आले आहेत. तर 33 जणांचा मृत्यू झाला आहे. एकट्या इंदौरमध्ये 221 कोरोनाग्रस्त आढळून आले असून भोपाळमध्ये कोरोनाचे 98 रुग्ण आढळून आले आहेत. राज्याच्या आरोग्य मंत्रालायने अद्यायावत माहिती जाहीर केली आहे.

'नागरिकांचा जीव सर्वात जास्त महत्त्वाचा आहे. अर्थव्यवस्था पुन्हा उभी करता येऊ शकती. पण जर नागरिकांचा जीव जात असेल तर त्यांना आपण माघारी आणू शकत नाही. जर गरज पडली तर लॉकडाऊन वाढवण्यात येईल, परिस्थिती पाहून पुढील निर्णय घेतला जाईल, असे मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आधीच स्पष्ट केले आहे.

रुग्णांची वाढती संख्या पाहता देशात 21 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. मात्र, परिस्थितीत सुधारणा झाली नाही तर लॉकडाऊन वाढविण्याची शक्यता वर्तवली जात आहे. लॉकडाऊन उठवण्यासाठी पंतप्रधान मोदींनी राज्यसरकारांकडून कल्पना मागविल्या आहेत. तेलंगाणाचे मुख्यमंत्री के. सी. राव यांनी दोन आठवड्यांनी संचारबंदी वाढविण्याची विनंती केंद्र सरकारकडे केली आहे. तर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी संचारबंदी वाढविण्याचे संकेत दिले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details