सूर्यापेठ (तेलंगणा) -भारत आणि चीनमध्ये झालेल्या लडाख येथील गलवान खोऱ्यामध्ये झालेल्या चमकमीमध्ये भारताचे 20 जवान हुतात्मा झाले. या पैकी एक लष्करी अधिकारी कर्नल संतोष बाबू हे देखील होते. ते तेलंगणा राज्यातील सूर्यापेठचे रहिवासी होते. बुधवारी (दि. 17 जून) रात्री त्यांचे पार्थिव तेलंगणाच्या सूर्यापेठ येथे आणण्यात आले. त्यांच्या पार्थिवावर आज (दि. 18 जून) दुपारी साश्रू नयनांनी लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
हुतात्मा कर्नल संतोष बाबू यांच्या पार्थिवावर झाले अंत्यसंस्कार
हुतात्मा कर्नल संतोष बाबू यांच्या पार्थिवावर आज लष्करी इतमामामध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. तेलंगणाचे राज्यपाल तमिलसी सुंदरराजन आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री के. टी. रामाराव यांनी हुतात्मा संतोष बाबू यांना श्रद्धांजली अर्पण केली. संतोष बाबूंचे बलिदान संपूर्ण देश कायम स्मरणात ठेवेल, अशा शब्दांत राज्यपालांनी शोक व्यक्त केला.
हुतात्मा संतोष बाबू यांच्या अंत्ययात्रेला प्रचंड जनसमुदाय उपस्थित होता. यावेळी संतोष बाबू अमर रहे, भारत माता की जय, वंदे मातरम अशा घोषणा देण्यात आल्या. बुधवारी (दि. 17 जून) त्यांचे पार्थिव नवी दिल्लीहून हवाई दलाच्या विशेष विमानाने हैदराबादच्या हकीमपेठ भागात रात्री 8 वाजता आणण्यात आले. यावेळी तेलंगणाचे राज्यपाल तमिलसी सुंदरराजन आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री के. टी. रामाराव यांनी हुतात्मा संतोष बाबू यांना श्रद्धांजली अर्पण केली. संतोष बाबूंचे बलिदान संपूर्ण देश कायम स्मरणात ठेवेल, अशा शब्दांत राज्यपालांनी शोक व्यक्त केला.
हेही वाचा - तामिळनाडूचे हुतात्मा जवान के. पलानी यांच्यावर लष्करी इतमामात झाले अंत्यसंस्कार