नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) दिल्लीचा आज दीक्षांत समारंभ झाला. पंतप्रधान मोदींनी आयआयटीच्या विद्यार्थ्यांना संबोधित केले. यावेळी त्यांनी आत्मनिर्भर भारतावरावर भाष्य केले. यापूर्वी मला आयआयटी मद्रास, आयआयटी बॉम्बे, आयआयटी गुवाहाटीच्या दीक्षांत समारंभाला संबोधित करण्याची संधी मिळाली होती. प्रत्येक ठिकाणी मला नवनिर्मिती दिसून आली आहे, असे मोदी म्हणाले.
मोदींच्या भाषणातील मुद्दे -
- देशातील युवकांना व्यवसाय करण्यात सुलभता निर्माण करून देण्यासाठी सरकार कटीबद्ध आहे.
- आपल्या नवविचारांद्वारे तरुण देशवासीयांच्या जीवनात बदल घडवतील.
- जागतिकीकरण महत्त्वपूर्ण आहेच. मात्र, त्यासोबत आत्मनिर्भर होणेही गरजेचे आहे.
- आज देश प्रत्येक क्षेत्रात नवनिर्मिती करण्यासाठी प्रयत्न करत असून विविध पर्यायांचा अवलंब करत आहे.