बंगळुरु - 'इस्रो ही कधीही हार न मानणारी संस्था आहे. मी तुमच्यासोबत आहे. देशही तुमच्यासोबत आहे. प्रत्येक संकट, समस्या आपल्याला नवी काहीतरी देऊन जाते. शिकवून जाते. विज्ञानात विफलता नसते. केवळ प्रयोग आणि प्रयास असतात. यातून नवे अंकुर फुटतात. चांद्रयानला अपेक्षित यश मिळाले नसले तरी, चांद्रयानाचा प्रवास दमदार राहिला आहे,' असे म्हणत मोदींनी शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले.
इस्रो ही कधीही हार न मानणारी संस्था, चांद्रयानाचा प्रवास दमदार - पंतप्रधान
आप मक्खन पे लकीर करनेवाले नही पत्थर पे लकीर करनेवाले लोग हैं. शास्त्रज्ञांच्या कुटुंबीयांनाही सलाम.
विक्रम लँडरशी संपर्क तुटल्यामुळे चांद्रयान -२ खाली उतरण्यामध्ये अडथळा निर्माण झाला. २.१ किमी अंतरावर असताना विक्रम लँडरचा नियंत्रण कक्षाशी संपर्क तुटला. संपर्क पुन्हा सुरळीत होण्यासाठी शास्त्रज्ञ प्रयत्न करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्व शास्त्रज्ञांचा अभिमान असल्याचे म्हटले आहे. संपूर्ण देश तुमच्या पाठीशी आहे. सर्व काही धीराने घ्या, असे सांगत मोदींनी शास्त्रज्ञांना मानसिक बळ दिले. याशिवाय, राष्ट्रपती रामनाथ कोविंद, गृहमंत्री अमित शाह यांच्यासह सर्व नेत्यांनीही इस्रोने आतापर्यंत मिळवलेल्या यशाबद्दल त्यांचे अभिनंदन केले आहे.