महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

...अन् टिकटॉकच्या व्हिडिओमुळे घडून आली पिता-पुत्राची भेट

एकीकडे टिकटॉक अ‌ॅप काही व्हिडिओंमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडला असून त्याला बंद करण्याच्या मागण्या जोर धरत आहे. तर, दुसरीकडे यातीलच एका व्हिडिओच्या माध्यमातून दोन वर्षापूर्वी बेपत्ता झालेल्या व्यक्तीपर्यंत पोहोचण्यात त्याच्या कुटुंबीयांना मदत मिळाली आहे.

...अन् टिकटॉकच्या व्हिडिओमुळे घडून आली पिता-पुत्राची भेट
...अन् टिकटॉकच्या व्हिडिओमुळे घडून आली पिता-पुत्राची भेट

By

Published : May 24, 2020, 1:07 PM IST

Updated : May 24, 2020, 2:34 PM IST

हैदराबाद - दोन वर्षापूर्वी बेपत्ता झालेल्या व्यक्तीची माहिती त्याच्या घरच्यांना टिकटॉकटच्या एका व्हिडिओद्वारे कळली आहे. ही व्यक्ती पंजाबमध्ये भीक मागत असताना दोन जणांनी त्याची मदत केल्याचा एक व्हिडिओ टिकटॉकवर टाकण्यात आला होता. याच व्हिडिओतून त्या व्यक्तीची ओळख त्याच्या घरच्यांना पटली आहे.

याच व्हिडिओमुळे घडून आली पिता-पुत्राची भेट

एकीकडे टिकटॉक अ‌ॅप काही व्हिडिओंमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडला असून त्याला बंद करण्याच्या मागण्या जोर धरत आहे. तर, दुसरीकडे यातीलच एका व्हिडिओच्या माध्यमातून दोन वर्षापूर्वी बेपत्ता झालेल्या व्यक्तीपर्यंत पोहोचण्यात त्याच्या कुटुंबीयांना मदत मिळाली आहे.

व्यंकटेश्वरलु नामक हा व्यक्ती तेलंगणा राज्याच्या भद्राद्री जिल्ह्यातील रहिवासी आहे. त्याला दोन मुली आणि ३ मुले आहेत. तो दोन वर्षांपूर्वी अचानक बेपत्ता झाला होता. त्याने आपण कामावर जात असल्याचे सांगून घर सोडले होते व यानंतर तो घरी परतलाच नाही. व्यंकटेश्वरलुच्या कुटुंबीयांनी याबाबत बर्गमपडु पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. तेव्हापासून पोलीस व्यंकटेश्वरलूचा शोधात होते.

दरम्यान, एकेदिवशी टिकटॉकवर सर्फिंग करत असताना गावातील एका तरुणास एका व्हिडिओमध्ये व्यंकटेश्वरलु दिसला. या व्हिडिओमध्ये व्यंकटेश्वरलु पंजाबमध्ये भीक मागताना दिसत असून दोन व्यक्ती त्याची मदत करत आहेत. या व्हिडिओ बघताच त्या तरुणाने लागलीच वेंकटेश्वरलूची माहिती त्याने आपल्या कुटुंबीयांना दिली. यानंतर, व्यंकटेश्वरलुच्या मुलाने माहिती काढून संबंधित अधिकाऱ्यांना कळविले आणि त्याला परत पाठवण्याची विनंती केली. तसेच, पंजाबला जाण्यासाठी विशेष परवानगी घेऊन तेथील पोलिसांच्या मदतीने त्याने व्यंकटेश्वरलुला शोधून काढले आणि गावी परत घेऊन परत आला.

दरम्यान, आजच्या काळात इंटरनेट नावाचं जाळ इतकं विस्तृत झालं आहे, कि आपण क्षणात जगातल्या कुठल्याही भागाची माहिती घेऊ शकतो. तर, यात जगभरातल्या लोकांची ऑनलाईन भेट घडवून आणण्यात समाज माध्यमांची विशेष भूमिका राहिली आहे. आज प्रत्येकजण ही कुठल्या ना कुठल्या तरी समाज माध्यमातून स्वत:ला जगासमोर ठेवत असल्याचे दिसते. यातच, व्यंकटेश्वरलुसारख्या बेपत्ता झालेल्या लोकांसाठीही ही समाज माध्यमे आशेचा किरण ठरताहेत. एकीकडे टिकटॉकच्या काही व्हिडिओतून काही गंभीर प्रकार समोर येत असले तरी, दुसरीकडे व्यंकटेश्वरलुसारख्या लोकांसाठी ही माध्यमे त्यांना त्यांच्या कुटुंबीयांपर्यत पोहोचवण्यातही मदतशील ठरताहेत.

Last Updated : May 24, 2020, 2:34 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details