नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी देशवासियांना ट्विट करून ईस्टरच्या शुभेच्छा दिल्या. "ईस्टरचा हा सण आपल्यावर आलेल्या या संकटावर मात करण्यासाठी बळ देईल आणि एक सुदृढ विश्व पुन्हा स्थापन करण्याची सुरुवात ठरेल" अशी आशा मोदींनी ट्विट मध्ये व्यक्त केली
“ईस्टरच्या विशेष प्रसंगी सर्वांना हार्दिक शुभेच्छा. "प्रभू येशू यांनी गरजू आणि गरिबांच्या उद्धारासाठी आपले जीवन समर्पित केले होते त्यांचे आज(रविवार) ईस्टरच्या निमित्ताने स्मरण करूयात" असे मोदींनी ट्विट करून म्हटले आहे. प्रभु ख्रिस्ताचे उदात्त विचार, विशेषकरुन गरीब व गरजूंना शक्ती व पाठबळ देण्याची त्यांची अटळ प्रतिबद्धता आम्हाला आठवते,” असे पंतप्रधानांनी ट्विटरवर लिहिले. “या इस्टरमुळे कोरोनासारख्या महामारीवर यशस्वीरित्या मात करण्यासाठी आणि एक सुदृढ विश्व निर्माण करण्यासाठी आम्हाला आणखी सामर्थ्य मिळेल.” अशी आशा त्यांनी यावेळी व्यक्त केली.