महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Aug 12, 2019, 4:05 PM IST

ETV Bharat / bharat

VIDEO : विशाखापट्टणममध्ये कोस्टल गार्डच्या जहाजाला भीषण आग; पेटत्या जहाजातून खलाशांच्या समुद्रात उड्या

आंध्रप्रदेशमध्ये विशाखापट्टणमध्ये भर समुद्रात कोस्टल जग्वार जहाजाला भीषण आग लागली आहे.

विशाखापट्टणमध्ये भर समुद्रात जाहजाला भीषण आग

विशाखापट्टणम -आंध्रप्रदेशमध्ये विशाखापट्टणममध्ये भर समुद्रात कोस्टल जग्वार जहाजाला भीषण आग लागली आहे. या पेटत्या जहाजावरील लोकांनी समुद्रात उड्या मारल्या आहेत. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.


विशाखापट्टणमच्या समुद्रात आज सकाळी 11.30 च्या सुमारास कोस्टल जग्वार जहाजाला आग लागली आहे. या जहाजावरील 29 कर्मचाऱ्यांनी पाण्यात उड्या मारल्या आहेत. तर 28 जणांना कोस्ट गार्डने वाचविले आहे. यापैकी 1 जण बेपत्ता झाला आहे. कोस्टल जग्वार जहाज समुद्रातीर इतर जहाजांना अन्न आणि पाणी पुरवण्याचे काम करते.

ABOUT THE AUTHOR

...view details