कोलकाता - पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा प्रस्ताव टीएमसीच्या बैठकीत दिला आहे. कोलकाता येथे तृणमूल काँग्रेसच्या झालेल्या बैठकीत ममतांनी पक्षश्रेष्ठींकडे त्यांची इच्छा व्यक्त केली आहे. आज पत्रकार परिषदेत ममतांनी याबाबत माहिती दिली आहे.
ममता बॅनर्जींचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याचा प्रस्ताव
पश्चिम बंगालमध्ये २०२१ सालापर्यंत ममता बॅनर्जींचे सरकार आहे. तरीही त्यांच्या राजीनामाच्या इच्छेमुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
पश्चिम बंगाल मुख्यमंत्री ममता बॅनर्जी
पश्चिम बंगाल सरकारचा २०२१ सालापर्यंत कालावधी आहे. तरीही त्यांच्या राजीनामाच्या इच्छेमुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने पश्चिम बंगालमध्ये चांगली कामगिरी केली होती. भाजपचे १८ खासदार निवडून आल्याने तृणमूल काँग्रेससमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे.