महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

देशातील सर्वोत्तम शैक्षणिक संस्थाचे 'अटल' मानांकन,  राज्यातील ३ शैक्षणिक संस्थांचा समावेश

औषधीय संस्थांच्या श्रेणीमध्ये मुंबई येथील रसायन तंत्रज्ञान संस्थेने (आयसीटी मुंबई) चौथा क्रमांक पटकाविला आहे तर सर्वोत्कृष्ट १० विद्यापीठांमध्ये सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे १० व्या क्रमांकावर आहे.

आयआयटी मुंबई

By

Published : Apr 9, 2019, 4:28 AM IST

Updated : Apr 9, 2019, 7:48 AM IST

नवी दिल्ली - केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने शैक्षणिक संस्थांसाठी अटल रँकिंग ऑफ इन्स्टिट्यूशन्स ऑन इनोव्हेशन अचिव्हमेंट' हे स्वतंत्र मानांकन केले आहे. देशातील शैक्षणिक संस्थांचे पहिले मानांकन हे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते जाहीर करण्यात आले. या मानांकनामध्ये देशातील सर्वोत्कृष्ट संस्थांमध्ये महाराष्ट्रातील ३ शैक्षणिक संस्थांचा समावेश झाला आहे.

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्यावतीने विज्ञान भवनात आयोजित कार्यक्रमात आयोजित करण्यात आला. त्यामध्ये उच्च शैक्षणिक संस्थांची राष्ट्रीय संस्थात्मक रँकिंग-२०१९ जाहीर करण्यात आली. शिक्षण, शैक्षणिक साधने, संशोधन तसेच व्यावसायिक पध्दती हे निकष आहेत. यामध्ये एकूण ८ श्रेणींमध्ये पहिल्या १० सर्वोत्कृष्ट संस्थांची यादी जाहीर करण्यात आली. यात महाराष्ट्रातील ३ संस्थांचा विविध ५ श्रेणींमध्ये समावेश आहे.

अटलच्या शैक्षणिक मानानंकनात आयआयटी मुंबई ही चौथ्या स्थानावर आहे. तर मागील काही वर्षांत विविध मानांकनामध्ये मागे पडलेल्या मुंबई विद्यापीठाच्या श्रेणीत थोडी सुधारणा झाल्याचे दिलासादायक चित्र समोर आले आहे. दुसरीकडे सरकारी अनुदानावर सुरू असलेल्या व उच्च शिक्षण देणाऱ्या संस्था मागील पाच वर्षात सरकारने स्वायत्त केल्या आहे. त्याही मानांकनाध्ये आघाडीवर आहेत. तसेच खाजगी संस्थाही वरच्या श्रेणीत असल्याचे मानांकनात दर्शविले आहे.

असेही राज्यातील शैक्षणिक संस्थांचे मानांकन-

भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबईने (आयआयटी बॉम्बे) यात ४ था क्रमांक पटकावला आहे. यासह सर्वोत्कृष्ट अभियांत्रिकी संस्थाच्या श्रेणीमध्ये भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबईने (आयआयटी मुंबई) तिसरे स्थान मिळविले आहे. तर सर्वोत्कृष्ट व्यवस्थापन संस्थांच्या श्रेणीमध्ये याच संस्थेने १० वा क्रमांक पटकाविला आहे. औषधीय संस्थांच्या श्रेणीमध्ये मुंबई येथील रसायन तंत्रज्ञान संस्थेने (आयसीटी मुंबई) चौथा क्रमांक पटकाविला आहे तर सर्वोत्कृष्ट १० विद्यापीठांमध्ये सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे १० व्या क्रमांकावर आहे.


राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते देशातील सर्वोत्कृष्ठ ८ शैक्षणिक संस्थांना विविध श्रेणींमध्ये यावेळी सन्मानित करण्यात आले. 'राष्ट्रीय संस्थात्मक रँकिंग-२०१९ ' मध्ये देशभरातील ४ हजार शैक्षणिक संस्थांनी सहभाग घेतला होता.

Last Updated : Apr 9, 2019, 7:48 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details