महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

मदुराई विद्यापीठात कमी किमतीच्या ‘व्हेंटिलेटर कम रिसपिरेटर’चा शोध

विशेष म्हणजे कमी किमतीच्या आधुनिक व्हेंटिलेटर कम श्वसन यंत्राचा शोध लावला आहे. हे व्हेंटिलेटर पार्टिक्युलेट मॅटर किंवा बॅक्टेरियांना आत प्रवेश करू देत नाही, असे कुलगुरू प्रा. एम. कृष्णन यांनी सांगितले.

कुलगुरू
कुलगुरू

By

Published : Jun 11, 2020, 7:34 PM IST

मदुराई (तामिळनाडू) - येथील मदुराई कामराज विद्यापीठातील संशोधकांनी कमी किमतीचा ‘व्हेंटिलेटर कम रिसपिरेटर’ निर्माण केला आहे. कोरोना विषाणूशी लढा देण्याच्या भारताच्या प्रयत्नांना विद्यापीठाकडून मदत मिळत आहे. ऑक्सिजनवर उच्च प्रमाणात लक्ष केंद्रित करण्याची क्षमता असलेल्या आणि विशेष म्हणजे कमी किमतीच्या आधुनिक व्हेंटिलेटर कम श्वसन यंत्राचा शोध लावला आहे. हे व्हेंटिलेटर पार्टिक्युलेट मॅटर किंवा बॅक्टेरियांना आत प्रवेश करू देत नाही, असे कुलगुरू प्रा. एम. कृष्णन यांनी सांगितले.

व्हेंटिलेटरची वैशिष्ट्ये

  • शुद्ध हवा प्रदान करते (लहान कण असलेल्या घटकांशिवाय)
  • एलआयडीएस-व्हीआरमध्यो 11 सेकंदात 33 टक्के पेक्षा जास्त ऑक्सिजन निर्माण होतो.
  • पोर्टेबल आणि वजन कमी - सुमारे 100 ग्रॅम
  • रिचार्ज करण्यायोग्य बॅटरीद्वारे ऑपरेट, बॅटरी 8 तास पुरते
  • लहान कण, सूक्ष्मजंतू आणि बॅक्टेरिया प्रवेश करू शकत नाही
  • डिस्पोजेबल कारतूस
  • कमी किमतीची सामग्री वापरली जाते
  • सेन्सर असलेले नॅनो सर्किट्स (ओ 2, सीओ 2, आर्द्रता आणि दबाव)
  • दोन प्रकारचे एलआयडीएस-व्हीआर उपलब्ध आहेत (मोबाइल अ‌ॅपनेही नियंत्रण)
  • हे रुग्णांच्या आवश्यकतेनुसार आपोआप नियमित होते.

कोरोना विषाणूने जगभरात दहशत माजवली आहे. कोरोनामुळे लोकांच्या दैनंदिन कामकाजावर परिणाम होत आहे. लोकांना मास्क वापरण्याची गरज आता लक्षात येऊ लागली आहे. एका संशोधनानुसार जगातील 80 टक्के लोक आता त्यांची कामे करत असताना मास्क वापरण्यास तयार आहेत, अशी माहिती समोर आली आहे. मास्क वापरल्यामुळे कोरोना प्रसाराला मोठा आळा बसत आहे. त्यामुळे कोरोना रुग्णसंख्या कमी होऊ शकते. शिंकण्या, खोकण्यामुळे होणारा विषाणूचा प्रसार रोखला जातो. संशोधनानुसार, मास्कचा वापर लोकांनी केल्याने कोरोनामुळे होणारे मृत्यू 45 टक्क्यांनी कमी झाल्याचे दिसून आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details