भोपाळ - मध्यप्रदेशात एका दहा वर्षांच्या मुलाने बँकेतून तब्बल 10 लाख रुपयांची चोरी केली आहे. 30 सेंकदाच्या आत सर्वांचे लक्ष चुकवून कॅश काऊंटरवर जाऊन त्याने पैसे चोरले. ही घटना राज्यातील निमूच शहरातील जावाद जिल्हा सहकारी बँकेत घडली. पोलिसांनी याप्रकऱणी गुन्हा दाखल केला असून मुलाचा शोध सुरु केला आहे.
दहा वर्षाच्या मुलानं बँकेतून चोरले तब्बल 10 लाख रुपये
सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे पोलिसांनी तपास सुरु केला आहे. सकाळी 11 च्या दरम्यान एक लहान मुलगा बँकेत शिरला होता. काही वेळातच त्याने सर्वांचे लक्ष चुकवून कॅश काऊंटरवरील 500 च्या नोटांचे बंडल उचलले.
सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे पोलिसांनी तपास सुरु केला आहे. सकाळी 11 च्या दरम्यान एक लहान मुलगा बँकेत शिरला होता. काही वेळातच त्याने सर्वांचे लक्ष चुकवून कॅश काऊंटरवरील 500 च्या नोटांचे बंडल उचलले आणि त्याच्या जवळील पिशवीत टाकले. कोणाचेही लक्ष न जाता हा मुलगा बँकेतून पसार झाला.
चोरी झाली त्यावेळी लहान मुलाला बँकेतीच कोणीतरी मार्गदर्शन करत होते. त्याच्या सांगण्यानुसारच मुलाने चोरी केल्याचे तपासात उघड झाले आहे. या संशयीत व्यक्तीचा आणि मुलाचा शोध घेण्यात येत आहे. पोलिसांनी संपूर्ण परिसर सील केला आहे. लहान मुलांचा चोरीत वापर करण्याच्या अनेक घटना याआधी घडलेल्या आहेत. त्यानुसार या चोरीमागे असणाऱ्या व्यक्तीचा पोलीस शोध घेत आहेत.