पाटणा -बिहारमध्ये मंगळवारी दुसर्या टप्प्यातील मतदान होणार आहे. सर्वाधिक गर्दी खेचणारे भाजपचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा प्रचारात उतरले आहेत. विशेष म्हणजे, त्यांचे मेळावे बिहारमधील 200 मैदानावर डिजिटल पद्धतीने प्रसारित केले जातील, जेथे अधिक प्रमाणात लोक जमा होऊ शकतील.
बिहारमध्ये पंतप्रधान मोदींचे मेळाव्यात भाषण मंगळवारी पंतप्रधानांचे दोन मेळावे होणार आहेत. यातील एक अरारिया येथे आणि दुसरा सहरसा येथे. दोन्ही मेळावे मुद्दामच दिवसा लवकर ठेवले आहेत.
सकाळी पहिला मेळावा सकाळी साडेनऊ वाजता अरारिया येथे होईल. या वेळी, पंतप्रधान मोदी फारबिसगंजच्या हवाई अड्डा मैदानावर 'विशाल जनसभे'ला संबोधित करतील, असे भाजपने म्हटले आहे. तर, दुसरा मेळावा 11.30 वाजता सहरसाच्या पटेल मैदानावर होणार आहे.
हेही वाचा -'भाजीपाल्याला एमएसपी देण्यासंदर्भात आम्ही कायदा करणार'
या रॅलींचे थेट प्रक्षेपण भाजपकडून बिहारमधील 200 मैदानांवर केले जात आहे. एकत्र जमलेल्या लोकांना मोदींना रिअल-टाइममध्ये पहाता यावे, यासाठी त्या 200 मैदानावर मोठी पडदे लावले आहेत. मध्यमपासून वरिष्ठ स्तरावरील भाजप नेत्यांना या ठिकाणी उपस्थित राहून गर्दीचा उत्साह वाढवण्याचे आवाहन केले आहे. मंगळवारी दुसर्या टप्प्यातील मतदान बिहारमधील 17 जिल्ह्यात होणार आहे.
या टप्प्यात एकूण 94 जागांसाठी मतदान होणार आहे. यापैकी भाजप 46 जागांवर लढेल. तर, जदयूचे उमेदवार 43 जागांवर लढतील. राज्यात आरजेडी-कॉंग्रेस-डाव्या आघाडीला पराभूत करण्याचा या दोन पक्षांच्या युतीचा प्रयत्न असेल.
हेही वाचा -मुंबई ते हैदराबाद लवकरच बुलेट ट्रेन... देशभरात अन्य सहा प्रकल्पांची घोषणा