महाराष्ट्र

maharashtra

उद्योगपती नेस वाडियांना जपानमध्ये २ वर्षाचा तुरुंगवास, अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी शिक्षा

जपानमधील स्थानिक माध्यमाच्या माहितीनुसार न्यू चिटोसमध्ये  प्रशिक्षित कुत्र्यांनी कस्टम अधिकाऱ्यांना वाडिया यांच्याकडील अमली पदार्थाबाबत सावध केले होते. त्यानंतर वाडिया यांची तपासणी केली असता त्यांच्याजवळ २५ ग्रॅम गांजा असल्याचे आढळून आले.

By

Published : Apr 30, 2019, 1:27 PM IST

Published : Apr 30, 2019, 1:27 PM IST

Updated : Apr 30, 2019, 3:27 PM IST

नेस वाडिया

नवी दिल्ली- उद्योगपती नुस्ली वाडिया यांचे पुत्र नेस यांना अमली पदार्था जवळ बाळगणे चांगलेच भोवले आहे. अमली पदार्थ जवळ बाळगल्याप्रकरणी जपान न्यायालयाने नेस वाडियांना दोन वर्षे तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे. मात्र ही शिक्षा ५ वर्षांसाठी निलंबित ठेवण्यात आली आहे. पुढील ५ वर्षांच्या काळात नेस यांनी जपानमध्ये गुन्हा केल्यास त्यांची तुरुंगात रवानगी करण्यात येणार आहे.

वाडिया हे देशातील सर्वात श्रीमंत उद्योजक कुटुंबांपैकी एक कुटुंब आहे. वाडिया कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितले, की न्यायालयाचा निकाल स्पष्ट आहे. नेस वाडिया यांना ठोठावलेली शिक्षा ५ वर्षांसाठी निलंबित करण्यात आली आहे. नेस वाडिया सध्या भारतात आहे. त्यांच्यावर असलेल्या जबाबदारीवर कोणताही परिणाम होणार नसल्याचे वाडिया कंपनीच्या प्रवक्त्याने स्पष्ट केले.

वाडिया ग्रुप हा २८३ वर्षांपासून देशातील विविध उद्योगात आहे. नेस वाडिया हे किंग्ज एलेव्हन पंजाब क्रिकेट संघाचे भागीदार आहेत. त्यांना मार्चमध्ये उत्तर जपानच्या हॉक्कायडो या बेटावरील न्यू चिटोस विमानतळावर अटक करण्यात आली होती. जपानमधील स्थानिक माध्यमाच्या माहितीनुसार न्यू चिटोसमध्ये प्रशिक्षित कुत्र्यांनी कस्टम अधिकाऱ्यांना वाडिया यांच्याकडील अमली पदार्थाबाबत सावध केले होते. त्यानंतर वाडिया यांची तपासणी केली असता त्यांच्याजवळ २५ ग्रॅम गांजा असल्याचे आढळून आले.


वाडिया यांच्या मालकीच्या अनेक कंपन्या आहेत. यामध्ये बॉम्बे डायिंग, बॉम्बे बर्मन ट्रेडिंग, ब्रिटानिया इंडस्ट्रीज, गोएअर अशा कंपन्या आहेत. जपानमध्ये अमली पदार्थविरोधी कडक कायदे आहेत. सध्या या कायद्याची जपानमध्ये कठोरपणे अंमलबजावणी करण्यात येत आहे. सॅप्पोरो जिल्हा न्यायालयाने त्यांना २ वर्षाच्या तुरुंगावासाची शिक्षा ठोठावली आहे.

Last Updated : Apr 30, 2019, 3:27 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details