भारतीय वायूसेनेने आज पहाटे पाकव्याप्त काश्मीरमध्ये जैश-ए-मोहम्मद च्या तळांवर हवाई हल्ला केला. भारतीय वायूसेनेच्या 'मिराज २०००' जातीच्या १२ विमानांनी जैशच्या तळावर १ हजार किलोचे बॉम्ब टाकल्याची माहिती आहे. या हवाई हल्ल्यात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या 'मिराज २०००' या विमांनाची वैशिष्ट्य जाणून घेऊया -
मिराज २००० हे भारतीय वायूसेनेचे लढाऊ विमान आहे. ते फ्रान्सची कंपनी डसॉल्ट एव्हिएशनद्वारे बनवण्यात आले आहे. मिराज २००० चौथ्या जनरेशनचे मल्टिरोल, एकेरी इंजिन लढाऊ विमान आहे. या विमानाची पहिली हवाई उड्डाण १९७० मध्ये झाले होते. हे फायटर प्लेन ९ देशात सेवा पुरवतो आहे. या विमानात आतापर्यंतर बऱ्याच वेळा अपडेशन झाले आहे.